मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'नातं संपलं पण...', सुष्मिता सेनकडून पोस्ट लिहित रोहमन शॉलसोबतच्या ब्रेकअपवर शिक्कामोर्तब

'नातं संपलं पण...', सुष्मिता सेनकडून पोस्ट लिहित रोहमन शॉलसोबतच्या ब्रेकअपवर शिक्कामोर्तब

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल (Rohman Shawl) यांचे ब्रेकअप (Sushmita-Rohman Breakup) झाल्याची चर्चा आहे. आता सुष्मिता सेनने तिच्या ब्रेकअपच्या चर्चांवर मौन सोडले आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 23 डिसेंबर - बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल (Rohman Shawl) बराच काळ एकमेकांसोबत राहात आहेत. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. शॉपिंग असो, इव्हेंट्स असो किंवा व्हेकेशन, दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. दोघांचं प्रेम पाहून चाहते खूप खुश होत असत. दोघांच्या लग्नाबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. मात्र मागच्या काही दिवसांपासून या दोघांचं ब्रेकअप (Sushmita-Rohman Breakup) झाल्याची चर्चा आहे. आता सुष्मिता सेनने तिच्या ब्रेकअपच्या चर्चांवर मौन सोडले आहे. अभिनेत्रीने रोहमन शॉलसोबतच्या तिच्या ब्रेकअपच्या वृत्ताला योग्य ठरवत सांगितले की, तिचे आणि रोहमन शॉलचे नाते फार पूर्वी संपले आहे. मात्र त्यांच्यातील प्रेम आजही कायम आहे.

सुष्मिता सेनने ब्रेकअपच्या चर्चेला दिला दुजोरा

सुष्मिता सेनने रोहमन शॉलसोबतचा तिचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये दोघेही सेल्फीसाठी पोज देत आहेत. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आमचे नाते मैत्रीपासून सुरू झाले, आम्ही मित्रच राहिलो. नातं खूप आधी संपलं...आता फक्त प्रेम राहिलं...😇❤️

वाचा-सुष्मिता सेन-रोहमन शॉलचा Break Up? 15 वर्षांनी लहान होता अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड

सुष्मिता सेनने तिच्या पोस्टमध्ये #nomorespeculations #liveandletlive #cherishedmemories #gratitude #love #friendship असे हॅशटॅग वापरले आहेत. सुष्मिता सेनची ही पोस्ट तिची आणि रोहमनची चांगली मैत्री असल्याचे सिद्ध करते. त्यांचे नाते संपले असेल पण दोघांमधील प्रेम अजूनही कायम आहे. जे नेहमी असेल.

वाचा-'तू माझ्यावर कधी प्रेम केलेच नाहीस..', तेजस्वीच्या बोलण्याने करण लागला रडू

चाहत्यांना आवडायाची दोघांची जोडी

सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलची जोडी चाहत्यांन खूप आवडली होती. दोघांचे लग्न झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या. रोहमनचे सुष्मिताच्या दोन्ही मुली आणि कुटुंबाशी चांगले संबंध होते. पण आता सुष्मिता आणि रोहमन एकत्र नाहीत हे जाणून अभिनेत्रीचे चाहते नाराज झाले आहेत. दोघांचे ब्रेकअप होण्याचे कारण काय होते, याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

रोहमन आणि सुष्मिताची भेट सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. रोहमनने सर्वप्रथम अभिनेत्रीला इन्स्टा वर मेसेज केला होता. यानंतर दोघेही एका फॅशन शोमध्ये भेटले. रोहमनसोबतच्या पहिल्या भेटीतच सुष्मिता सेन प्रभावित झाली होतीरोहमन शॉलपूर्वी सुष्मिता सेनने विक्रम भट्ट, वसीम अक्रम, रणदीप हुड्डा, हृतिक भसीन, मुदस्सर अजीज यांना डेट केले आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment