• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • जीवघेण्या Coronavirus वर सुश्मिता सेननं सुचवलं 100% गुणकारी औषध!

जीवघेण्या Coronavirus वर सुश्मिता सेननं सुचवलं 100% गुणकारी औषध!

सुश्मिता सेननं जीवघेण्या कोरोना व्हायरसवर एक गुणकारी औषध सुचवलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 27 मार्च : कोरोना व्हायरसचा प्रभाव मनोरंजन क्षेत्रावरही पडला आहे. अनेक सेलिब्रेटी त्यांच्या सिनेमांची शूटिंग थांबवून घरी राहिले आहेत आणि आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांनाही घरी राहून स्वतःची काळजी घेण्याचं आणि सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. अशात अभिनेत्री सुश्मिता सेनचं एक ट्विट जोरदार व्हायरल होत आहे. सुश्मितानं जीवघेण्या कोरोना व्हायरसवर एक गुणकारी औषध सुचवलं आहे. सुश्मिता सेननं तिच्या ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे ज्यात तिनं या औषधाबद्दल माहिती दिली आहे. सुश्मितानं तिच्या ट्विटरवर एका औषधाच्या बाटलीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, घरी राहा सुरक्षित राहा. या ट्विटमध्ये शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये जी औषधाची बाटली आहे त्यावर औषधाचं नाव ‘घरी राहा सुरक्षित राहा’ असं लिहिलं असून त्याखाली हे औषध 100% गुणकारी असल्याचंही म्हटलं आहे. 'तू मला भेटलास ना एकदा की, मग तुझी खैर नाही...' महेश मांजरेकरांची ट्रोलरला धमकी सध्या करोना व्हायरसची लागण होण्यापासून स्वत:ला वाचवायचं असेल तर घरी बसण्याशिवाय पर्याय नाही, असं अनेकदा सांगण्यात येत आहे. तरीही लोक फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. अशा वेळी सेलिब्रिटींकडून विविध पद्धतीने चाहत्यांमध्ये जनजागृती निर्माण केली जात आहे. अक्षय कुमार, सलमान खान, कार्तिक आर्यन या कलाकारांनी सोशल मीडियावरून जनतेला घरी राहण्याचं आवाहन केलं आहे. कोरियन वेब सीरिजने 2018 मध्येच केली होती Coronavirus ची भविष्यवाणी, पाहा Video रामायणातील सीता वयाच्या 64 व्या वर्षींही दिसते ग्लॅमरस, सध्या या कामात असते बीझी
  Published by:Megha Jethe
  First published: