'आमची पहिली भेट मॅक्सिकोत झाली', सुष्मिताची एक्स बॉयफ्रेंड रिकीसोबतची पोस्ट चर्चेत

'आमची पहिली भेट मॅक्सिकोत झाली', सुष्मिताची एक्स बॉयफ्रेंड रिकीसोबतची पोस्ट चर्चेत

'आमची पहिली भेट मॅक्सिकोत झाली आणि तेव्हा मी 18 वर्षांची होते आणि रिकी 22 वर्षांचा', असं सुष्मिताने फोटो शेअर करताना म्हटलंय.

  • Share this:

19 एप्रिल : अभिनेत्री सुष्मिता सेनचं लव्हलाईफ नेहमीच चर्चेत राहिलं आहे. नुकतंच सुष्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुष्मिता तिचा बॉयफ्रेंड रिकी मार्टिनसोबत दिसतेय. सुष्मिताने रिकीसोबतचा फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय.

'आमची पहिली भेट मॅक्सिकोत झाली आणि तेव्हा मी 18 वर्षांची होते आणि रिकी 22 वर्षांचा', असं सुष्मिताने फोटो शेअर करताना म्हटलंय.

या पोस्टमध्ये सुष्मिताने लिहलं की, मला दोन मुली आहेत आणि त्याला दोनं मुलं आहेत. सुष्मिताच्या या पोस्टमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

रिकी मार्टिन हा एक लोकप्रीय गायक, लेखक आणि अभिनेता आहे. रिकी हा समलिंगी आहे. सुरूवातीच्या काळात रिकी आणि सुश्मिता रिलेशनशिपमध्ये होते. पण हे रिलेशन फार काळ टिकले नाही. यानंतर रिकीने त्याचा समलिंगी मित्र योसेफसोबत लग्न केले.

पण दरम्यान, मी आणि रिकी आम्ही एकमेकांसोबत बराच वेळ घालवला. या काळात आम्ही एकमेकांना जाणून घेतले. त्याने स्वत:ची ओळख मान्य केली, त्यावेळी मला त्याचा अभिमानचं जास्त वाटला. स्वत:चा डिएनए मान्य करण्यासाठी बरेच धैर्य लागते, असं सुष्मिता एका मुलाखतीत म्हणाली होती.

 

First published: April 19, 2018, 9:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading