'या' प्रश्नाचं उत्तर देऊन 25 वर्षांपूर्वी सुश्मिता जिंकली होती मिस युनिव्हर्सचा किताब

'या' प्रश्नाचं उत्तर देऊन 25 वर्षांपूर्वी सुश्मिता जिंकली होती मिस युनिव्हर्सचा किताब

1994 हे वर्ष भारतासाठी फार खास होतं. याचवर्षी सुश्मिताने मिस युनिव्हर्स आणि ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता.

  • Share this:

मुंबई, 21 मे- सुश्मिता सेनने 1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून भारताचं नाव उंचावलं. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय महिला होती. 21 मे रोजी सुश्मिताने हा किताब स्वतःच्या नावावर केला. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर २५ वर्ष जुना व्हिडिओ शेअर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. सुश्मिताला यासाठी तिच्या चाहत्यांकडून अनेक शुभेच्छाही मिळत आहेत. तसेच सुश्मिताचा प्रियकर रोहमन शॉलने तिचं अभिनंदन करत प्रेमाची कबुली दिली.

सुश्मिताला मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून भलेही २५ वर्ष झाली असतील, पण आजही तिच्या चाहत्यांना एका प्रश्नाची उत्सुकता लागून राहिली आहे. ही उत्सुकता म्हणजे सुश्मिताला विचारण्यात आलेला प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर देऊन तिने मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावावर केला होता.

लोकसभेच्या बॉक्स ऑफिसवर हे बॉलिवूडकर ‘फ्लॉप’?

विशेष म्हणजे, मिस इंडियाच्या स्पर्धेत सुश्मिताचा सामना ऐश्वर्या रायशी होता. एखादी ऐतिहासिक घटना बदलण्याची संधी मिळाली तर कोणती घटना बदलायला आवडेल असा प्रश्न दोघांनाही विचारण्यात आला. यावर ऐश्वर्याने ‘आपला जन्म’ असं उत्तर दिलं तर सुश्मिताने ‘इंदिरा गांधी यांचा मृत्यू’ हे उत्तर दिलं होतं.

 

View this post on Instagram

 

(part 3) Sushmita Sen Facing Final Question & Answer Round at Miss Universe 1994 . . @missuniverse @missuniverse.india @missuniversequeens @missworld @missworld_time @missindiaorg . . . . 💠❄️❄️💠❄️❄️💠❄️❄️💠❄️❄️💠❄️❄️💠❄️❄️💠 #missuniverse #missunivers1994 #sushmitasen #missuniverse2017 #manushichhillar #missworld #missworld2017 #missindia #beautywithapurpose #manushi #india #mumbai #delhi #dance #talent #mw2017 #mw #dancing #deepikapadukone #aishwaryarai #priyankachopra #bestoftheday #picoftheday #instagood #fashiondiaries #fashionstyle #model #fashion #photooftheday #outfit 💠❄️❄️💠❄️❄️💠❄️❄️💠❄️❄️💠❄️❄️💠❄️❄️💠

A post shared by bollywood mirror 🇮🇳 (@bollywood.mirror) on

मिस युनिव्हर्सच्या अंतिम फेरीत सुश्मिता सेनला विचारलं होतं की, तुझ्याकडे जर वेळ आणि पैसा असेल तर तू कोणती साहसी गोष्ट करशील? याचं उत्तर देताना सुश्मिता म्हणाली की, ‘माझ्यासाठी साहस ते आहे ज्याची तुम्हाला आतून जाणीव होते. मला मुलांसोबत रहायला आवडतं. मला जर संधी मिळाली तर मला त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला आवडेल.’

चुलत बहिणीनेच जितेंद्रवर केले होते लैंगिक शोषणाचे आरोप, अखेर न्यायालयाने दिला हा निर्णय

सुश्मिताच्या या दोन उत्तरांनी तिला मिस इंडियाचा किताब जिंकवून देऊन मिस युनिव्हर्स स्पर्धेत एण्ट्री मिळाली होती. १९९४ हे वर्ष भारतासाठी फार खास होतं. याचवर्षी सुश्मिताने मिस युनिव्हर्स आणि ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता.

अवंतिकाने सोडलं इम्रानचं घरं, 8 वर्षांचा संसार तुटणार?

SPECIAL REPORT: एक्झिट पोलनंतर सोशल मीडियावर मीम्सला उधाण

First published: May 21, 2019, 4:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading