तब्बल १६ वर्ष लहान प्रियकराच्या आकंठ प्रेमात बुडाली सुष्मिता सेन, शेअर केला खास VIDEO

तब्बल १६ वर्ष लहान प्रियकराच्या आकंठ प्रेमात बुडाली सुष्मिता सेन, शेअर केला खास VIDEO

या व्हिडिओमध्ये दोघांची केमिस्ट्री अफलातून वाटत आहे. दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचं स्पष्ट दिसतं. रोहमनची नजर तर सुष्मितापासून हटतही नाही.

  • Share this:

मुंबई, ०८ मार्च- बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिच्या लव्ह लाइफमुळे चांगलीच चर्चेत आहे. सुष्मिता तिच्याहून १६ वर्ष लहान मॉडेल रोहमन शॉलला डेट करत आहे. सुष्मिता अनेकदा रोहमनसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. दोघंही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांसाठीचं प्रेम व्यक्त करत असतात.

 

View this post on Instagram

 

The only Man I go up on my toes for!!!My Rooh @rohmanshawl This was super naughty of you @subisamuel & how I love you for it!!!❤️ #us #inthemoment #rohmance #clickclick #sharing #magnets mmuuuaaah

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

नुकताच सुष्मिताने रोहमनसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये दोघांची केमिस्ट्री अफलातून वाटत आहे. दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचं स्पष्ट दिसतं. रोहमनची नजर तर सुष्मितापासून हटतही नाही. हे एक व्हिडिओ शूट आहे. दोघांनी नुकतंच याचं शुटिंग पूर्ण केलं. चित्रीकरणादरम्यानचा हा व्हिडिओ सुष्मिताच्या चाहत्यांना फार आवडला. अनेकांना या दोघांची जोडी फार पसंत पडत आहे. या शूटमध्ये दोघांनी डान्सही केला.

व्हिडिओ शेअर करताना सुष्मिताने लिहिले की, ‘The only Man I go up on my toes for!!!My Rooh’ यावेळी सुष्मिताने सोशल मीडियावर त्याला आय लव्ह यू म्हटले. काही महिन्यांपूर्वी सुष्मिता तिच्या भाच्याच्या लग्नाला गेली होती. यावेळी तिच्यासोबत या लग्नाला रोहमनही होता. संपूर्ण कार्यक्रमात ती फार आकर्षक दिसत होती. तिचे या लग्नातले सर्व फोटो रोहमननेच काढले होते.

 

View this post on Instagram

 

Sushhhhh!!! They’re looking!!!❤️#softwhispers #loudfeelings #simplyus @rohmanshawl

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

सुष्मिताच्या घरातल्यांनाही रोहमन फार आवडतो. या दोघांच्या नात्याला त्यांनी या आधीच संमती दिली आहे. सुष्मिताच्या दोन्ही मुलींसोबत रोहमनची बॉण्डिंग फार स्ट्राँग आहे. आता सुश्मिताच्या चाहत्यांना दोघांचं लग्न लवकरात लवकर पाहण्याची इच्छा आहे.

VIDEO : अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा आणि सुप्रिया सुळे...कसं आहे नणंद-भावजयमधील बाँडिंग?

First published: March 8, 2019, 7:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading