बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री करणार 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडशी लग्न

बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री करणार 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडशी लग्न

या अभिनेत्रीनं अद्याप मीडियासमोर कधीच तिच्या नात्याची कबुली कधीही दिलेली नाही मात्र सोशल मीडियावर ती बॉयफ्रेंडसोबत फोटो आणि पोस्ट शेअर करत असते.

  • Share this:

मुंबई, 1ऑगस्ट: बॉलिवूडमध्ये सध्या लिंकअप आणि ब्रेकअपच्या चर्चा सुरू आहेत. नुकतंच या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. असं बोललं जात आहेकि, बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडशी लग्न करण्याच्या तयारीत आहे. या अभिनेत्रीनं अद्याप मीडियासमोर कधीच तिच्या नात्याची कबुली कधीही दिलेली नाही मात्र सोशल मीडियावर ती बॉयफ्रेंडसोबत फोटो आणि पोस्ट शेअर करत असते. याशिवाय तिच्या भावाच्या लग्नातही तिचा बॉयफ्रेंड दिसला होता. ही अभिनेत्री आहे सुश्मिता सेन.

साराच्या फॅमिलीला इंप्रेस करण्यासाठी कार्तिक आर्यनची धडपड!

 

View this post on Instagram

 

Why so serious Jaan Meri @rohmanshawl brilliant group effort for this #familyselfie WE FIT #sharing #sunflowers #cherished #moments #holiday #yerevan #armenia we love you guys!!!❤️#duggadugga

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

मीडिया रिपोर्ट्सनुसार 43 वर्षीय सुश्मिता स्वतःपेक्षा 15 वर्षांनी लहान असलेला बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत लग्न करणार आहे. एका प्रसिद्ध मासिकानं दिलेल्या वृत्तानुसार सुश्मिता येत्या नोहेंबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे. खरं तर रोहमननं सुष्मिताला याआधीच लग्नासाठी प्रपोज केलं असून तिनं त्याला हो सुद्धा म्हटलं आहे. तसेच सुश्मिताच्या मुलींसोबत रोहमनचं खास बॉन्डिंग आहे.

शनायानं शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो, 'हे' आहे कारण

काही दिवसांपूर्वी सुश्मिताच्या भावाचं लग्न झालं यावेळी रोहमन त्या सर्व फंक्शनमध्ये दिसला होता. लग्नाच्या प्रत्येक फॅमिली फोटोमध्ये तो सुश्मितासोबत दिसला. त्यामुळे तो सुश्मिताच्या फॅमिलीच्या किती जवळ आहे हे दिसून येतं. याशिवाय सुश्मिताच्या दोन मुली आहेत. ज्यांना तिनं दत्तक घेतलं आहे. या दोघांशीही रोहमन खूप स्पेशल बॉन्डिंग शेअर करताना दिसतो. काही दिवसांपूर्वी या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात होतं मात्र या दोघांनीही या सर्व अफवा असल्याचं त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून स्पष्ट केलं.

Bigg Boss Marathi 2 : ...आणि नेहाला झाले अश्रू अनावर!

==============================================================

VIDEO: मी गद्दार नाही, भाजप प्रवेशानंतर चित्रा वाघ भावुक!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 07:10 PM IST

ताज्या बातम्या