‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री पडली चाहत्याच्या प्रेमात, अशी झाली पहिली भेट

‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री पडली चाहत्याच्या प्रेमात, अशी झाली पहिली भेट

काही महिन्यांपूर्वीच या अभिनेत्रीनं आपल्या नात्याची जाहीर कबूली सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली होती.

  • Share this:

मुंबई, 04 जून : बॉलिवूमध्ये रिलेशनशिप-ब्रेकअप, लग्न-घटस्फोट या सर्व गोष्टींना फारसं महत्त्व दिलं जात नाही. पण सिने कारकिर्दीपेक्षा अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या अफेअर्सच्या चर्चाच इथं सर्वाधिक होताना दिसतात. सध्या बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन सुद्धा तिच्या रिलेशनशीपमुळे खूप चर्चेत आहे. सुश्मिता सध्या मॉडेल रोहमन शॉल याला डेट करत आहे. पण रोहमन आणि सुश्मिताची पहिली भेट कधी आणि कशी झाली हे ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

 

View this post on Instagram

 

#thebeckoning @rohmanshawl ❤️#us

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

रोहमन आणि सुश्मितानं काही महिन्यांपूर्वीच आपल्या नात्याची जाहीर कबूली सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली होती. पण नुकत्याच एका मुलाखतीत सुश्मितानं तिची आणि रोहमनची ओळख कशी झाली याचा खुलासा केला. रोहमन आणि सुश्मिताची ओळख इन्स्टाग्रामवरून झाली. रोहमननं तिला एक पर्सनल मेसेज पाठवला होता पण या मेसेजचं उत्तर मिळेल अशी अपेक्षा नव्हती. पण त्याच्या नशीबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं.

अरे देवा! प्रदर्शनापूर्वीच 'भारत'ची क्रेझ, या राज्यात तिकिटांसाठी रस्सीखेच

सुश्मिता सांगते, ‘त्यावेळी मी इन्स्टाग्रामवरील डायरेक्ट मेसेजचा ऑप्शन वापरत नसे. तिच्या मते अशा मेसेजना उत्तर दिलं तर समोरच्या व्यक्तीला आपण आपल्या पर्सनल लाइफमध्ये जागा देतो. पण माझ्या मुलींना समजावताना अचानक रोहमनच्या मेसेजवर मी चूकून टॅप केलं आणि तो मेसेज उघडला.’

Miss u मिस्टर- लग्नानंतरही जेव्हा मृण्मयी देशपांडेला लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये रहावं लागलं

सुश्मिता पुढे म्हणाली, ‘मला त्याचा मेसेज एवढा आवडला की, मी त्याला रिप्लाय केला. हे पाहिल्यावर रोहमनला खूप आनंद झाला आणि अशाप्रकारे आमच्या गप्पा सुरू झाल्या.’ सुश्मिता आणि रोहमन पहिल्यांदा त्याच्या फुटबॉल मॅच दरम्यान भेटले. रोहमन मॅच खेळत होता आणि ती मॅच पाहण्यासाठी त्यानं सुश्मिताला बोलवलं होतं. त्यानंतर दुसऱ्यांदा ते दोघं कॉफी डेटवर गेले आणि त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली. त्यांच्या नात्याला आता जवळपास 9ल महिने झाले आहे आहेत.

अचानक का चर्चेत आलाय आमिर खानच्या लेकीचा बेली स्टड आणि टॅटू

First published: June 4, 2019, 9:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading