S M L

VIDEO : सुष्मिता सेनचा 'हा' डान्स व्हिडिओ झाला व्हायरल, बॉलिवूडमध्ये पुन्हा करणार एण्ट्री?

अभिनेत्री सुष्मिता सेनचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या डान्सच्या व्हिडिओमुळे सुष्मिता बॉलिवडमध्ये पुन्हा एण्ट्री करणार?

News18 Lokmat | Updated On: Jan 9, 2019 07:33 PM IST

VIDEO : सुष्मिता सेनचा 'हा' डान्स व्हिडिओ झाला व्हायरल, बॉलिवूडमध्ये पुन्हा करणार एण्ट्री?

मुंबई, 09 जानेवारी : बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत येत आहे. गेल्या आठ वर्षांपासून एकाही सिनेमात काम केलं नसलं तरी सोशल मीडियावर मात्र ती सध्या झळकत आहे. सुष्मिता सेन नुकताच तिच्या रिलेशनशिपमुळे बरीच चर्चेत आली होती.

रेहमन शॉलसोबत असलेली रिलेशनशिप आणि सोशल मीडियावर असलेली चर्चा यामुळे सुष्मिताला अनेकवेळा ट्रोलही करण्यात आलं. चर्चेत येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सुष्मिता तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटोज सतत सोशल माीडियावर शेअर करत असते. फिटनेसमुळे ओळखली जाणारी सुष्मिता यावेळी एका डान्समुळे चर्चेत आली आहे. नुकताच सुष्मिताने कथक डान्सचा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या या डान्स व्हिडिओला लाईक्स हा डान्स तिच्या आगामी चित्रपटासाठी तर नाही असा प्रश्नसुद्धा सोशल मीडियावर विचारला जात आहे.

व्हिडिओमध्ये सुष्मिता कथक डान्स करताना फार छान दिसत आहे. सफेद रंगाच्या ड्रेसवर बांधणीची ओडणीसोबत ती कथकचा सराव करत आहे.अचानक सिष्मिताची कथक शिकण्याची इच्छा पाहता ही तयारी तिच्या येणाऱ्या चित्रपटासाठी तर नाही असा प्रश्नही विचारला जात आहे.

Loading...

 

View this post on Instagram
 

#12345 🎵😁💃🏻 A simple count that can lead to such happiness, poise, awareness, balance, rhythm & grace😍❤️👏😀 This beautiful soul @pritam_shikhare who I consider as both my Maa & Guru, always takes me back to basics, a source that is pure & divinely childlike!!😇😍💃🏻 A place where I twirl & laugh, dancing with abandonment to the sound of 12345!!!😄💃🏻🎵❤️ I love you Pritam Maa, keep spreading your infectious positive energies, the world needs it!!!🙏😍😇 #sharing #happiness #love #ayearofcelebrations #25years #missuniverse1994 #india🇮🇳 ❤️I love you guys!!!!😍


A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2019 07:23 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close