मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sushmita Sen : ललित मोदींच्या गर्लफ्रेंडला मोह आवरेना; 'लव्ह आमची मुंबई' म्हणत सुश्मिताचे ते फोटो आले समोर

Sushmita Sen : ललित मोदींच्या गर्लफ्रेंडला मोह आवरेना; 'लव्ह आमची मुंबई' म्हणत सुश्मिताचे ते फोटो आले समोर

Sushmita sen

Sushmita sen

सुष्मिता सेन गेल्या काही दिवसांपासून ललित मोदीसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. या सगळ्या दरम्यान सुष्मिताचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • Published by:  Nishigandha Kshirsagar
मुंबई, 17 ऑगस्ट : बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत  आहे. सगळीकडे सध्या तिच्या अभिनयापेक्षा वैयक्तिक आयुष्याचीच चर्चा जास्त होते. सुष्मिता सेन ही ललित मोदींसोबत रिलेशनशिपमध्ये आहे अशी माहिती समोर आली होती. ललित मोदींनी सोशल मीडियावर दोघांचे फोटो शेअर करत ही माहिती दिली होती. त्यानंतर सुश्मिता सेनेच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.  या प्रकरणावर स्पष्टीकरण  देत सुश्मिता सेनने ती आयुष्यात आनंदी असल्याचं सांगितलं होतं. ही अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने पोस्ट केलेल्या प्रत्येक पोस्टची चर्चा होते. आताही तिने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या पावसाळा सुरु आहे. अनेक कलाकार पावसाचा आनंद घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. सुश्मिता सेनने सुद्धा तिचे पावसाचा आनंद घेतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोना चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. फोटोमध्ये सुष्मिता कारमध्ये  बसून पावसाच्या आनंद लुटताना दिसत आहे. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये “या मुलीला पाऊस खूप आवडतो!!! या मुलीला 'आमची मुंबई' आवडते!!' असं लिहिलं आहे.
अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. एका चाहत्याने तिच्या या पोस्टवर भन्नाट कमेंट केली आहे. त्याने लिहिलं आहे कि, 'मुंबईत मुसळधार  पाऊस पडण्याचं कारण तूच आहेस.' हेही वाचा - Maadhavi Nemkar : 'शालिनी' नाव कोरलेली पर्स, वरती साडी पण खाली पॅन्ट माधवीचा लुक फारच भन्नाट; पाहा फोटो सुष्मिता अनेक सेलिब्रिटींसोबत रिलेशनमध्ये होती. पण अभिनेत्रीने अद्याप लग्न केलं नाही. एवढंच नाही तर, सुष्मिताने दोन मुलींना दत्तक घेतलं आहे. सुष्मिताची मोठी मुलगी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सुष्मिता  अलीकडेच 'आर्या' या वेब्सिरिज्मध्ये झळकली होती. या भूमिकेसाठी तिचे प्रचंड कौतुक झाले होते.
First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News

पुढील बातम्या