News18 Lokmat

सुष्मिताने १६ वर्ष लहान बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा? एकदा या अंगठीची खासियत पाहाच

सुष्मिताच्या उजव्या हातात ती रिंग दिसत आहे. तर साखरपुड्याची अंगठीही नेहमी डाव्या हातात घातली जाते.

News18 Lokmat | Updated On: Apr 27, 2019 05:18 PM IST

सुष्मिताने १६ वर्ष लहान बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा? एकदा या अंगठीची खासियत पाहाच

नवी दिल्ली, २७ एप्रिल- सुष्मिता सेन आणि ग्लॅमर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भलेही ती सिनेमांमध्ये दिसत नसली तरी तिच्या चाहत्यांमध्ये तसूभरही घट झालेली नाही. त्याउलट सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांमध्ये वाढच होत आहे. नुकताच सुष्मिताने प्रियकर रोहमन शॉलसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यात सुष्मिताच्या हातात एक अंगठी दिसत आहे. ती अंगठी पाहून तिने साखरपुडा केला असल्याची चर्चा सध्या बी- टाऊनमध्ये आहे.

गेली ३० वर्ष हा अभिनेता लढतोय एड्सची लढाई, कधीही होऊ शकतो मृत्यू

सुष्मिताच्या उजव्या हातात ती रिंग दिसत आहे. तर साखरपुड्याची अंगठीही नेहमी डाव्या हातात घातली जाते. सुश्मिताने हा फोटो शेअर करताना म्हटलं, ‘कोणाला बिनशर्त प्रेम करणं कठीण असतं असं म्हटलं जातंय. आपल्या हृदयाची हाक ऐकणं हेही फार कठीण असतं.पण जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हा मनात विश्वास निर्माण होतो. प्रेम तर एक बोनस आहे. माझ्या मनाची हाक ऐकत मी कोणत्याही अटीशिवाय तुझी आहे रोहमन शॉल.’

‘एकदा तरी तिने मला कॉल करायचा होता...’ जेव्हा दीपिका पदुकोणने रणबीरला म्हटलं होतं विश्वासघाती, त्याने दिली होती ही प्रतिक्रिया


Loading...आता सलमान खानशी भिडणार आलिया आणि रणबीर कपूर
…म्हणून एवेंजर्स सिनेमा संपण्याच्याआधीच थिएटरमधून बाहेर पडले सुशांत सिंग राजपूत

सुष्मिताची ही अंगठी केटी पेरीच्या अंगठीची आठवण करून देते. फुलाच्या आकाराची केटीच्या अंगठीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. केटीला ही अंगठी तिचा प्रियकर ओरलॅन्डो ब्लूमने दिली होती. सुष्मिताच्या या फोटोवर चाहते सतत कमेंट करत तुझा साखरपुडा झाला का हाच प्रश्न विचारत आहेत. सुष्मिता अनेकदा तिचे आणि रोहमनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. पण दोघांनीही आतापर्यंत अधिकृतरित्या आपल्या नात्याचा स्वीकार केलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 27, 2019 04:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...