होय, माझाही विनयभंग झाला होता- सुश्मिता सेन

एका कार्यक्रमात १५ वर्षाच्या मुलाकडून माझा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार अभिनेत्री सुष्मिता सेननं सांगितला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 23, 2018 06:20 PM IST

होय, माझाही विनयभंग झाला होता- सुश्मिता सेन

२३ मे : एका कार्यक्रमात १५ वर्षाच्या मुलाकडून माझा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार अभिनेत्री सुष्मिता सेननं सांगितला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने या घटनेचा खुलासा केला. सुरक्षारक्षक आणि प्रसारमाध्यमांच्या घोळक्यातही सेलिब्रिटींसोबत असे प्रकार घडू शकतात, असं ती म्हणाली.

त्या घटनेबद्दल सुष्मिता म्हणाली की, 'सहा महिन्यांपूर्वीची घटना आहे. मी एका पुरस्कार सोहळ्यात होते आणि पत्रकारांचा घोळका माझ्या आजूबाजूला होता. एका १५ वर्षीय मुलाने विनयभंग केला आणि गर्दी असल्याने मी त्याला पकडू शकणार नाही असं त्याला वाटलं. जेव्हा मी त्याचा हात पकडून त्याला पुढे खेचलं तेव्हा मला धक्काच बसला. तो १५ वर्षांचा मुलगा होता. या घटनेबद्दल मी वाच्यता केली तर तुझं आयुष्यच संपेल, असं जेव्हा मी त्याला म्हणाली तेव्हा यापुढे असं कधीच कोणासोबत करणार नाही असं बोलून त्याने माझी माफी मागितली

सेलिब्रिटींना इतकी सुरक्षा असते, त्यांच्यासोबत कधीच काही घडू नाही शकत असं अनेकांना वाटतं. पण ते खरं नसतं, असंही ती म्हणाली. त्याचसोबत स्वत:च्या सुरक्षेसाठी मुलींनी, तरुणींनी काही गोष्टी शिकल्या पाहिजेत असं आवाहनसुद्धा तिने केलं. लैंगिक अत्याचार आणि बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षाच देण्यात यावी, असंही मत तिने यावेळी मांडलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2018 06:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...