ब्रेकअपच्या चर्चांनंतर सुश्मिता सेननं शेअर केला बॉयफ्रेंडसोबत ‘तो’ फोटो

ब्रेकअपच्या चर्चांनंतर सुश्मिता सेननं शेअर केला बॉयफ्रेंडसोबत ‘तो’ फोटो

Sushmita Sen | Rohman Showl | काही दिवसांपूर्वी रोहमननं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली होती ज्यामुळे सुश्मिता आणि रोहमन यांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात होतं.

  • Share this:

मुंबई, 2 जुलै :बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनच्या ब्रेकअपच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू होत्या. बॉयफ्रेंड रोहमन शॉलच्या काही इन्स्टाग्राम स्टोरीजवरून सुश्मिता आणि रोहमनचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या मात्र आता या सर्व चर्चा केवळ अफवा असल्याचं सिद्धा झालं. यानंतर रोहमन आणि सुश्मितानं काही सोशल मीडियावर काही पोस्ट टाकत ब्रेकअपच्या चर्चांना ब्रेक लावला होता. त्यानंतर नुकताच सुश्मितानं रोहमनसोबतचा एक फोटो पोस्ट करत त्याला एक रोमँटिक कॅप्शनही दिलं आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

झायरा वसीमच्या प्रकरणात तिसरं ट्वीस्ट, मॅनेजरने केलं ‘घूमजाव’

काही दिवसांपूर्वी रोहमननं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली होती ज्यामुळे सुश्मिता आणि रोहमन यांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात होतं. रोहमननं लिहिलं होतं, ‘एखाद्या नात्यात जर तुम्हाला वाटत असेल की, फक्त तुम्हीच त्या नात्यासाठी काही करत आहात तर हे चुकीचं आहे. कारण तुम्ही त्या नात्यासाठी जे काही करत आहात हा तुमचा निर्णय आहे. त्यामुळे तुमच्या जोडीदारानंही तुमच्याशी तसंच वागावं अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या जोडीदारासाठी काही करायचंच असेल तर कोणतीही अपेक्षा न ठेवता करा.’

बिहारमध्ये बॉलिवूडचे हे दोन सुपरस्टार नवऱ्यांच अपहरण करून लग्न लावतात, पाहा VIDE

रोहमनचा या पोस्ट सर्वत्र व्हायरल झाल्या होत्या. मात्र त्यानंतर सुश्मितानं रोहमन सोबतचा फोटो शेअर करत सर्वांची बोलती बंद केली. यामध्ये सुश्मिता आणि रोहमन जीममध्ये वर्कआउट करताना दिसत आहेत. सुश्मितानं या फोटोच्या कॅप्शनमध्ये रोहमनला आय लव्ह यू म्हटलं आहे. या फोटोमुळे सुश्मिता आणि रोहमनमध्ये सर्वकाही अलबेल असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्याच्या ब्रेकअपच्या चर्चा तुर्तास तरी थांबल्या आहेत.

रिंकूचे हे फोटो होतायेत व्हायरल, दिसते बोल्ड अँड ब्युटिफुल

=========================================================

VIDEO: अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरही साचलं गुडघाभर पाणी

First published: July 2, 2019, 1:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading