दीपिका-प्रियांकानंतर आता सुष्मिता सेनच्या घरी वाजणार सनई-चौघडे

दीपिका-प्रियांकानंतर आता सुष्मिता सेनच्या घरी वाजणार सनई-चौघडे

सुष्मितानं बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत गुपचूप साखरपुडा उरकल्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत.

  • Share this:

मुंबई, 5 मे : अभिनेत्री अनुष्का शर्मा पाठोपाठ मागच्या वर्षी नेहा धुपिया, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा लग्नाच्या बेडीत अडकल्या. यात दीपिका आणि प्रियांका यांचे लग्न सोहळे विशेष चर्चेचा विषय ठरले. यानंतर आता मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेनच्या घरी लगीन घाई सुरु झाली आहे. याची माहिती सुष्मितानंच सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत दिली.

सुष्मितानं बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत गुपचूप साखरपुडा उरकल्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अशातच सुष्मितानं नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो सध्या सर्वांचं लक्ष वेधत आहे. सुष्मिताच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार असून खुद्द सुष्मितानं याविषयीची माहिती तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली. सुष्मिताचा लहान भाऊ राजीव सेन लग्न करत असून त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबतचा फोटो सुष्मितानं सोशल मीडियावर पोस्ट केला.

राजीव टीव्ही मालिका 'मेरे अंगने में'ची अभिनेत्री चारू असोपाशी लग्न करत आहे. आधी चारूनं अनेक हिंदी मालिकांध्ये लहान-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. 'ये रिश्ता क्या कहलाता है' 'संगिनी' या मालिकांमध्येही तिनं काम केलं आहे. आपल्या भावाच्या लाग्नाची माहिती देताना सुष्मितानं लिहिलं, 'तिनं 'हो' म्हटलं आहे. राजा भैय्या, तू जगातला सर्वात नशीबवान मुलगा आहेस. या परीचे आमच्या आयुष्यात आल्याबद्दल आभार. अभिनंदन चारू. तुमच्या लग्नाची वाट बघते आहे. मी तर वर आणि वधू दोन्हीकडून डान्स करणार.'

याशिवाय सुष्मितानं आणखी एक फोटो शेअर केला ज्यात सुष्मितासोबत रोहमन शॉल, राजीव सेन आणि चारू दिसत आहेत. या फोटोला सुष्मितानं, 'कुटुंब, सर्कल ऑफ लव्ह, मी तुमच्या सर्वांवर प्रेम करते. तुमच्या आशीर्वादांसाठी धन्यवाद' असं कॅप्शन दिलं आहे. सुष्मिता स्वतःहून 16 वर्षांनी लहान असलेल्या रोहमन शॉलला डेट करत असून रोहमन एक मॉडेल आहे. त्याच्यासोबतच्या डेटचे फोटो नेहमीच सुष्मिता तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते.

काय आहे अभिनेत्री क्रिस्टल डिसुझा-हार्दिक पांड्यामधील नातं, 'त्या' फोटोवर नेटीझन्स म्हणतात...

SPECIAL REPORT : मतदानाच्या प्रश्नावर 'खिलाडी' भडकला, अखेर करावं लागलं 'हे' मान्य!

First published: May 5, 2019, 2:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading