सुश्मिता सेनच्या भावाने कोर्टात जाऊन केलं लग्न, इथे पाहा PHOTO

सुश्मिता सेनच्या भावाने कोर्टात जाऊन केलं लग्न, इथे पाहा PHOTO

लाइमलाइटपासून दूर राहणारा राजीव दागिन्यांचा व्यावसायिक आहे. दुबईसह देशातील अनेक ठिकाणी राजीवचा कोट्यवधींचा व्यवसाय आहे.

  • Share this:

मुंबई, 09 जून- बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनंतर माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनच्या घरीही सनई चौघडे वाजले. एक महिन्यापूर्वी सुष्मिताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिचा भाऊ राजीव सेन लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं. अखेर राजीव आणि त्याची प्रेयसीने आज कोर्ट मॅरेज केलं.गेल्या वर्षी दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांच्या राजेशाही लग्नांनी साऱ्यांचं लक्ष वेधलं. तर सुष्मिताच्या घरातलं हे लग्न अगदी साध्या पद्धतीने झाले. सुष्मिताच्या छोट्या भावाने प्रेयसी चारू असोपाशी कोर्ट मॅरेज केलं.

सेक्रेटरीच्या पार्थिवाला अमिताभ- अभिषेकने दिला खांदा, ऐश्वर्याही झाली भावुक

राजीव आणि चारू दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले. राजीवने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘मी राजीव सेन चारू असोपाला माझी पत्नी मानतो.’ दोघांनी कोर्ट मॅरेज केलं असून लवकरच ते मोठं रिसेप्शन देणार असल्याचं म्हटलं जात आहे. राजीव आणि चारूने शेअर केलेल्या फोटोंमध्ये सुष्मिता दिसत नसली तरी तिची आई मात्र दिसत आहे.

या अभिनेत्रीला आईने मारून काढलं होतं घराबाहेर, तिने वडिलांवर लावला १२ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

 

View this post on Instagram

 

i Rajeev sen take Charu asopa as my lawful wife ❤️ #rajakibittu

A post shared by Rajeev Sen (@rajeevsen9) on

३६ वर्षीय राजीव सेनने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता, तर चारूला लाल रंगाची साडी नेसली होती. यावेळी तिने लाल रंगाची लिपस्टिक आणि कमीत कमी मेकअप केला होता. २८ वर्षाची चारू ही टीव्ही अभिनेत्री आहे. चारूने मेरे अंगने में, ये रिश्ता क्या कहलाता है आणि संगिनी सिनेमात काम केलं.

पॉकेटमनीसाठी सोनम कपूर करायची वेटरची कामं

 

View this post on Instagram

 

I Charu Asopa take Rajeev Sen as my lawful husband... ❤️ #rajakibittu

A post shared by charu asopa♥♥ (@asopacharu) on

सारा अली खान की तारा सुतारिया, तुम्हाला कोणाचा समर लूक जास्त आवडला?

लाइमलाइटपासून दूर राहणारा राजीव दागिन्यांचा व्यावसायिक आहे. दुबईसह देशातील अनेक ठिकाणी राजीवचा कोट्यवधींचा व्यवसाय आहे. राजीव दुबईमध्येच राहतो आणि मुंबईत येऊन जाऊन असतो. काही महिन्यांपूर्वी राजीवने दिल्लीमध्ये रेने नावाने एक ज्वेलरी शोरूम सुरू केलं. रेने ही सुष्मिताची मोठी मुलगी आहे.

VIDEO : अंडी आणि टोमॅटोचा झाला बर्फ, फोडण्यासाठी जवानांना वापरावा लागतोय हातोडा

First published: June 9, 2019, 2:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading