16 वर्षांहून लहान प्रियकराला सुश्मिता म्हणाली, ‘हा माझ्या मुलींचा बाबा’

16 वर्षांहून लहान प्रियकराला सुश्मिता म्हणाली, ‘हा माझ्या मुलींचा बाबा’

एका व्हिडिओमध्ये रोहमननला सुश्मिता मराठी आणि बंगालीमध्ये आय लव्ह यू बोलायचं शिकवत होती.

  • Share this:

मुंबई, ०२ फेब्रुवारी २०१९- बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन आपल्या १६ वर्षांहून लहान प्रियकर रोहमन शॉलसोबतच्या नात्यामुळे सतत चर्चेत असते. अजूनपर्यंत तिने अधिकृतरित्या आपल्या नात्याबद्दल खुलासा केलेला नव्हता. मात्र आता तिच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून तिने दोघंजण रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट केलं आहे. सुश्मिताने तिची दुसरी मुललगी अलीशाच्या स्पोर्ट्स डेच्या दिवशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

या व्हिडिओमध्ये रोहमनशिवाय इतर मुलांचे वडिलही स्पर्धेत सहभागी होताना दिसत होते. विशेष म्हणजे या स्पर्धेत रोहमनने अलीशाचे वडील म्हणून सहभाग घेतला होता. १०० मीटर धावण्यात रोहमनने सर्वांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला.

सुश्मिताने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटले की, ‘अलीशाच्या शाळेत मुलांच्या वडिलांची धावण्याची स्पर्धा होती. यात रोहमनने सहभाग घेतला होता. आणि तो ही स्पर्धा जिंकलाही.’ सुश्मिता सेन सध्या तिच्या काश्मिरी प्रियकराला डेट करत आहे. ती हल्ली अनेकदा प्रत्येक कार्यक्रमात रोहमनसोबतच दिसते.

सुश्मिताने इन्स्टाग्रामवर रोहमनसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. एका व्हिडिओमध्ये रोहमननला सुश्मिता मराठी आणि बंगालीमध्ये आय लव्ह यू बोलायचं शिकवत होती. सुश्मिता सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली तर तिच्या अफेअर्समुळे ती नेहमीच चर्चेत असते. सुश्मिता रिनी आणि अलिशा या दोन मुलींची सिंगल मदर आहे. तिने या दोन्ही मुलींना दत्तक घेतलं आहे.

First published: February 2, 2019, 4:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading