मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /ललित मोदी ऑक्सिजनवर असताना सुष्मिता सेनला कोणी गिफ्ट केली मर्सिडिज कार? किंमत आहे खूप महाग

ललित मोदी ऑक्सिजनवर असताना सुष्मिता सेनला कोणी गिफ्ट केली मर्सिडिज कार? किंमत आहे खूप महाग


Sushmita Sen bought Mercedes

Sushmita Sen bought Mercedes

सुष्मिताला गाड्यांचं फार वेड आहे. तिनं तिच्या कार कलेक्शनमध्ये Mercedes AMG 53 Coupe या गाडीचा समावेश केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 जानेवारी: माजी मिस युनिवर्स सुष्मिता सेन मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे.  आपल्या अभिनयानं सुष्मितानं सर्वांची मनं जिंकली. तिच्या कामामुळे तिची चर्चा होत असते. मात्र ललित मोदी यांच्याबरोबर असलेल्या नात्याचा खुलासा केल्यानंतर सुष्मिताची चर्चा सुरूच आहे. काही दिवसांआधीच ललित मोदी यांची तब्येत खराब झाल्याची माहिती समोर आली होती. ललित मोदी ऑक्सिजनवर असल्याचे फोटो देखील व्हायरल झाले. अशात दुसरीकडे अभिनेत्रीनं घरी मर्सिडिज कार आणली आहे. सुष्मिताला ही गाडी गिफ्ट मिळाली आहे.  सुष्मिताला ही गाडी कोणी गिफ्ट दिली असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? पाहूयात.

अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण नेहमीच एन्जॉय करत असते. तिनं तिच्या मेहनतीनं आजवर  सक्सेफुल करिअर घडवलं. स्वत:चं आलिशान घर खरेदी केलंय. सुष्मिताला गाड्यांचं फार वेड आहे. तिनं तिच्या कार कलेक्शनमध्ये Mercedes AMG 53 Coupe या गाडीचा समावेश केला आहे. ही कार फार महागडी आहे.

हेही वाचा - 'मन्नत' पूर्ण करण्यासाठी गेटवर उभा राहिला फॅन, शाहरूखने थेट बेडवरूनच दिलं उत्तर

सुष्मितानं कार खरेदी केल्यानंतर एक व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओ शेअर करत तिनं आनंद व्यक्त केल्या. तिनं म्हटलंय, 'ज्या महिलांना ड्रायविंग करणं आवडतं त्या महिला स्वत:ला सुंदर गिफ्ट देतात'. यावरून हे लक्षात आलं आहे की सुष्मिताला इतकी महागडी गाडी गिफ्ट देणारी ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती स्वत: आहे.

अभिनेत्री ब्लॅक कलरची Mercedes AMG 53 Coupe गाडी खरेदी केली. गाडी घरी येताच सुष्मिता फार खुश झाली होती. तिनं गाडीला मॅचिंग ब्लॅक आऊटफिट्स कॅरी केले होते.  सुष्मितानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिची मर्सिडिज कार चकाकताना दिसतेय. मोठ्या अभिमानानं सुष्मिता त्या गाडीत बसली, सिटबेल्ट लावला आणि एकटीच लाँग ड्राइव्हसाठी निघून गेली.

सुष्मितानं गाडी खरेदी करताच चाहत्यांनी आणि कुटुंबियांनी तिला शुभेच्छा दिल्यात. तिची वहिनी चारू असोपा आणि भाऊ राजीव सेन यांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्यात. सुष्मितानं घेतलेल्या कारची किंमत ही 2 कोटी रुपये आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News