मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सुष्मिता सेन-रोहमन शॉलचा Break Up? 15 वर्षांनी लहान होता अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड

सुष्मिता सेन-रोहमन शॉलचा Break Up? 15 वर्षांनी लहान होता अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड

बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री सुष्मिता सेन   (Sushmita Sen)  आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल (Rohman Shawl)   बराच काळ एकमेकांसोबत राहात होते . दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 23 डिसेंबर-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री सुष्मिता सेन   (Sushmita Sen)  आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल (Rohman Shawl)   बराच काळ एकमेकांसोबत राहात आहेत. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. शॉपिंग असो, इव्हेंट्स असो किंवा व्हेकेशन, दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. दोघांचं प्रेम पाहून चाहते खूप खुश होत असत. दोघांच्या लग्नाबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. परंतु आता जी बातमी समोर येत आहे ती दोघांच्या चाहत्यांसाठी धक्क्यापेक्षा कमी नाही. या दोघांचं ब्रेकअप (Sushmita-Rohman Breakup)   झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. दोघांचं नातं संपुष्टात आल्यानंतर रोहमन शॉलनं अभिनेत्रीचं घर सोडलं असल्याचं म्हटलं जात आहे.

सुष्मिता-रोहमनचं नातं आलं संपुष्टात-

सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांच्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे की, दोघांमध्ये सर्व काही ठीक नाहीय. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, दोघांनी आता आपलं नातं संपवलं आहे. मात्र, या दोघांनीही या गोष्टीवर आतापर्यंत मौन बाळगलं आहे.रोहमन शॉल हा सुष्मिता सेनपेक्षा १५ वर्षांनी लहान आहे.

रोहमननं सोडलं सुष्मिताचं घर-

रिपोर्टमध्ये एका जवळच्या सुत्राच्या हवाल्यानं सांगण्यात आलं आहे की, दोघांचं नातं आता संपुष्टात आलं आहे. अर्थातच सुष्मिता सेन आणि रोहमन यांचा ब्रेकअप झाला आहे. रोहमन आता सुष्मिताचं घर सोडून गेला आहे. तो सध्या अभिनेत्रीसोबत तिच्या घरी राहत नाही. रोहमन आता आपल्या मित्राच्या घरी शिफ्ट झाला आहे.

सुष्मिता सेननं आधीच दिली होती हिंट?-

यावर्षी फेब्रुवारीमध्ये सुष्मितानं आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिनं बिघडलेल्या नात्यातून बाहेर पडण्याबद्दल लिहिलं होतं. यानंतर चाहत्यांनी अंदाज लावला होता की तिचं रोहमनसोबत ब्रेकअप झालं आहे का? मात्र, या जोडप्यानं एकत्र येत या सर्व अफवांना पूर्णविराम लावला होता.

(हे वाचा:करण जोहरच्या बाथरूममध्ये जाऊन असं काही करत होती सारा अली खान; समजताच बसला धक्का )

सुष्मितासोबत लग्नाबाबत रोहमन म्हणाला होता की, 'सुष्मिता, तिच्या मुली (रेनी आणि अलिशा) आणि मी एक कुटुंब आहोत. कधी मी तिच्या मुलींचा वडील बनतो तर कधी मी त्यांचा मित्र बनतो. आम्ही एका सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणे जगतो. लग्नाच्या प्रश्नावर त्यानं म्हटलं होतं, 'जेव्हा कधी लग्न होईल,तेव्हा ते लपून राहणार नाही. याबद्दल विचार झाल्यास नक्की सांगितलं जाईल'.

First published: