सुशांतच्या फार्महाऊसवर सेलेब्रिटी घ्यायचे LSD आणि कोकेन; 20 पानी कबुलीजबाबात रियाची धक्कादायक माहिती

सुशांतच्या फार्महाऊसवर सेलेब्रिटी घ्यायचे LSD आणि कोकेन; 20 पानी कबुलीजबाबात रियाची धक्कादायक माहिती

रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) सुशांतच्या ड्रग पार्ट्यांबद्दल मोठा खुलासा केला आहे. तिने कबुलीजबाबत असे म्हटले आहे की, सुशांत त्याच्या फार्महाऊसवर नेहमी पार्ट्यांचे आयोजन करायचा आणि त्यामध्ये त्याचे सेलेब्रिटी मित्र नेहमी ड्रग्स घेत असत.

  • Share this:

मुंबई, 12 सप्टेंबर : अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) ही सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) समोर आलेल्या ड्रग अँगलमध्ये मुख्य आरोप आहे. याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्‍यूरोने (NCB) रिया चक्रवर्तीला अटक केल्यानंतर तर या प्रकरणात अनेक बाबी समोर येत आहेत. याप्रकरणात रियाने 20 पानांचा कबुलीजबाब एनसीबीसमोर दिला आहे. या कबुलीजबाबात काही धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. ज्याच्याआधारे एनसीबी पुढील तपास करत आहे. NCBने तब्बल 7 ठिकाणी धाडी घातल्या असून त्यात ड्रग्जचा मोठा साठाही हाती लागल्याची माहिती मिळते आहे.

दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार या कबुलीजबाबत रियाने सुशांतच्या ड्रग पार्ट्यांबद्दल मोठा खुलासा केला आहे. तिने यामध्ये असे म्हटले आहे की, सुशांत त्याच्या लोणावळा याठिकाणी असणाऱ्या फार्महाऊसवर नेहमी पार्ट्यांचे आयोजन करायचा आणि त्यामध्ये त्याचे सेलेब्रिटी मित्र नेहमी ड्रग्स घेत असत. या पार्ट्यांमध्ये काही अभिनेते एलएसडी (LSD) आणि कोकेन या अंमली पदार्थांचे देखील सेवन करत असत.  नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो आता रियाने नावं सांगितलेल्या बॉलिवूडमधील सर्व ए-लिस्टर कलाकारांची चौकशी करण्याच्या तयारीत आहेत.

(हे वाचा-रिया चक्रवर्ती सुशांतबरोबर घेत होती ड्रग्ज, Unseen Video आला समोर)

रियाने तिच्या कबुलीजबाबात अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांची नावं घेतली असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रियाने केलेले खुलासे हे एनडीपीएस अधिनियम कायदा 67 अन्वये अंतर्गत आहेत.

रियाच्या कबुलीजबाबानुसार, बॉलिवूडमधील अनेकांनी सुशांतबरोबर ड्रग्जचं सेवन केलं होतं. ही पार्टी नेमकी कुठे झाली होती. याचीही माहिती रियाने चौकशीत दिली आहे. रियाने तिच्या कबुलीजबाबात दोन बड्या स्टार्सची आणि इतर काही छोट्या कलाकारांची नावं घेतल्याची माहिती समोर येते आहे. तिने एका फिल्ममेकरचे देखील नाव घेतले आहे. जेव्हा ती सुशांतबरोबर रिलेशनशीपमध्ये होती, त्यावेळी त्याने तिला या सर्व बाबी सांगितल्याचे रियाने म्हटले आहे. या पार्टीमध्ये ती नव्हती असल्याची माहिती देखील रियाने दिली आहे.

(हे वाचा-रिया-सुशांत ड्रग्ज प्रकरण: आणखी एक मोठा मासा KJ लागला गळाला, असा व्हायचा पुरवठा)

काही तासांपूर्वी NCBच्या गळाला आणखी एक मोठा मासा लागला आहे. ड्रग्ज पुरवढा करणारा ‘KJ’ याला शनिवारी अटक करण्यात आली आहे. करमजीत असं त्याचं नाव असून त्याला ‘KJ’ या टोपण नावाने ओळखलं जात होतं. मुंबईतून त्याला अटक करण्यात आला आहे. करमजीत कॅपरी आणि लिटिल हाइट् इथं ड्रग्ज पुरवढा करत होता अशी माहिती पुढे आली आहे. सॅम्युअल मिरांडा आणि रियाचा भाऊ शोविकला तो ड्रग्जचा पुरवढा करत होता. त्यानंतर हा सगळा माल रिया आणि सुशांतला दिला जात होता अशी माहितीही पुढे आली आहे. NCB कडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. शोविक सोबत त्याचे थेट संबंध असल्याने अनेक धक्कादायक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 12, 2020, 3:49 PM IST

ताज्या बातम्या