Home /News /entertainment /

सुशांतच्या दिलं होतं विष? मृत्यूपूर्वी मानेवरील खुणेमुळे संशय वाढला; व्हिसेरा रिपोर्ट पुन्हा तपासणार

सुशांतच्या दिलं होतं विष? मृत्यूपूर्वी मानेवरील खुणेमुळे संशय वाढला; व्हिसेरा रिपोर्ट पुन्हा तपासणार

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून प्रेरित होत सरला सारगोई आणि राहुल शर्मा याची चित्रपट निर्मिती करणार आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिलीप गुलाटी घेणार असून अभिनेता झुबैर खान सुशांत सिंह राजपूतची भूमिका साकारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून प्रेरित होत सरला सारगोई आणि राहुल शर्मा याची चित्रपट निर्मिती करणार आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिलीप गुलाटी घेणार असून अभिनेता झुबैर खान सुशांत सिंह राजपूतची भूमिका साकारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सध्या एम्सच्या डॉक्टरांची टीम सुशांतच्या शवविच्छेदनाच्या रिपोर्टसह अनेक बाबी पडताळून पाहत आहेत.

    मुंबई, 7 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर 14 जून रोजी त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. दुपारी आणलेल्या सुशांतच्या मृतदेहाचे रात्रीपर्यंत शवविच्छेदन करण्यात आले होते. अशात हा सवाल उपस्थित केला जात आहे की सुशांतचे शवविच्छेदन करण्यासाठी इतकी घाई का करण्यात आली. शवविच्छेदनानंतर सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट तपासणीसाठी सुरक्षित ठेवण्यात आला होता. व्हिसेरा रिपोर्टचा तपास करणाऱ्या एम्सच्या मेडिकल टीमला या प्रकरणात मदत मिळू शकते. AIIMS ची फॉरेंसिक टीम ही सुरक्ष‍ित ठेवण्यात आलेली सुशांतची व्हिसेरा टेस्ट पडताळून पाहत आहे. मेड‍िकल टीमला संशय आहे की सुशांतला विष देण्यात आलं होतं. AIIMS च्या फाॅरेंसिक डिपार्टमेंटचे हेड आणि सुशांत केससाठी गठीत केलेल्या मेड‍िकल बोर्डाचे चेअरमॅन डॉ. सुधीर गुप्ता यांनी सांगितले की येत्या 10 दिवसात याचा तपास करण्यात येणार असून रिपोर्टही तत्काळ मिळेल. या प्रकरणाबाबत मेडिकल बोर्डाची पुढली बैठक 17 सप्टेंबर रोजी होईल. AIIMS कडे व्हिसेरा टेस्टसाठी सर्व उपकरणं उपस्थित आहेत. ही उपकरणं FBI द्वारा वापरले जाते. अशात चूक होण्याची शक्यताच नाही. सुशांत प्रकरणात एम्सच्या तीन डॉक्टरांच्या टीमने सुशांतच्या बॉडीचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांशी बातचीत केली आहे. या चौकशीत एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतच्या गळ्यावर असलेल्या जखमांवर सवाल उपस्थित केला आहे. हे वाचा-ही तर भाजपची पोपट, काँग्रेस मंत्र्याची कंगनावर जळजळीत टीका मृत्यूनंतर सुशांतच्या गळ्यावरील जखमांवर सवाल रिपोर्टनुसार सुशांतच्या गळ्यावर असलेल्या खूणांवर सवाल उपस्थित केला जात आहे. सुशांत च्या गळ्यावरील खूणा (LIGATURE MARK) त्याच्या गळ्याच्या मध्यभागी आहे. मात्र आत्महत्या प्रकरणात या खुणा मानेच्या वरच्या बाजूला असतात. सांगितले जात आहे की एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना या खुणेवरुन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Sushant sing rajput

    पुढील बातम्या