Home /News /entertainment /

सुशांत ड्रग्स घ्यायचा का? NCB विचारणा रियाला हे 22 प्रश्न

सुशांत ड्रग्स घ्यायचा का? NCB विचारणा रियाला हे 22 प्रश्न

या सिनेमात रिया चक्रवर्तीची भूमिका श्रेया शुक्ला साकारणार आहे. श्रेयाने यापूर्वी एका वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

या सिनेमात रिया चक्रवर्तीची भूमिका श्रेया शुक्ला साकारणार आहे. श्रेयाने यापूर्वी एका वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

आज रविवारी सकाळी पुन्हा एकदा नार्कोटिक्स विभागाची टीम दाखल झाली. यावेळी समन्स घेऊन टीम रियाच्या घरी पोहोचली आहे.

    मुंबई, 06 सप्टेंबर : अभिनेता  सुशांत सिंह राजपूत प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहे. या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर रिया चक्रवर्ती भोवती फास आता आणखी आवळला जात आहे.  रियाचा  भाऊ शौविक चक्रवर्ती आणि नोकर सॅम्युल मिरांडाला NCB नं अटक केली असून 9 सप्टेंबरपर्यंत नार्कोटिक्स विभागाकडे कोठडी देण्यात आली आहे. रिया चक्रवर्तीची नार्कोटिक्स विभागाने चौकशी केली होती. या चौकशीचा तपशील समोर आला आहे. दरम्यान आज रविवारी सकाळी पुन्हा एकदा नार्कोटिक्स विभागाची टीम दाखल झाली. यावेळी समन्स घेऊन टीम रियाच्या घरी पोहोचली आहे. रियाला NCB कार्यालयात हजर राहण्याकरता समन्स बजावण्यात आला आहे.  त्यामुळे पुन्हा एकदा रियाची चौकशी होणार आहे. त्यासाठी NCB कार्यालयात रियाला घेवून जाणार आहेत. रिया चक्रवर्तीला NCB विचारणार 22 प्रश्न 1) तू व्हॉटसअप चॅटवर अंमली पदार्थांबाबत मॅसेज केलेस ते मॅसेज तूच केलेस का? 2) तू कुणा-कुणासोबत अंमली पदार्थांबाबत चॅटिंग केले आहे? 3) तू अंमली पदार्थ घेतेस का? हो तर, कोण कोणते अंमली पदार्थ घेतेस ? 4) व्हॉट्सअप चॅट हा पुरावा आहे की, तू फक्त अंमली पदार्थाची खरेदी विक्री नाही करायची तर तू अंमली पदार्थांचे सेवन देखील करायची? 5) तू कोणा करत अंमली पदार्थ खरेदी करत होतीस? 6) तू अंमली पदार्थ कोणा कडून खरेदी करायची 7) तू जे अंमली पदार्थ खरेदी करायची त्याचे पैसे कसे आणि कोण द्यायचे? 8) 15 मार्च 2020 या दिवशी तुझे आणि शौविकचे चॅटिंग आहे त्यात तू अंमली पदार्थांची मागणी कोटाकरिता करतेय? 9) तू सर्वात आधी कधी आणि कोणते अंमली पदार्थ घेतले होते? 10) तुझा भाऊ तुझ्या सांगण्यावरून अंमली पदार्थ आणायचा की, शौविकच्या संपर्कात आल्यानंतर तू अंमली पदार्थ घेवू लागली? 11) सुशांत अंमली पदार्थ घेतो हे तूला कधी समजले? 12) सुशांत अंमली पदार्थ घेतो हे तुला कळाल्यावर तू त्याला रोखले का नाही? तू शौविकच्या माध्यमातून सुशांत करता अंमली पदार्थ खरेदी करायची? १३) सुशांत कोणाकडून अंमली पदार्थ मागवायचा? 14) सुशांतला कोण अंमली पदार्थ द्यायचे? 15) सुशांतची तब्येत बरी नव्हती आणि तो अंमली पदार्थ घेत होता तर तू त्याला रोखले का नाही? 16) शौविक अंमली पदार्थ विकून पैसे कमवायचा तू देखील अंमली पदार्थ विकून पैसे कमावले आहेत का? 17) अंमली पदार्थ खरेदी करता तू कोणाचे पैसे वापरत होतीस? 18) बॉलिवूडच्या अंमली पदार्थ पार्ट्यांकरता कोण कोण अंमली पदार्थ सप्लाय करायचे? तुझ्या भावाने अनेकांचे नाव घेतले आहे? तुझ्या तोंडून ती नावे ऐकायची आहेत? 19) तू तुझ्या भावाच्या माध्यमातून कोणते आणि किती वेळा अंमली पदार्थ मागवलेत? 20) सॅम्युल मिरांडाच्या माध्यमातून तू अंमली पदार्थ मागवायची की, नेहमी शौविककडूनच अंमली पदार्थ मागवायची? 21) सुशांत आणि शोविक अंमली पदार्थ घ्यायचे हे तूला माहित होते का? 22) तू दिपेश कडून अंमली पदार्थ मागवायची का?
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या