धक्कादायक! सुशांत सिंहच्या मृत्यूपूर्वीच कसं झालं विकिपीडियावर अपडेट? CBI तपासाच्या मागणीला जोर

धक्कादायक! सुशांत सिंहच्या मृत्यूपूर्वीच कसं झालं विकिपीडियावर अपडेट? CBI तपासाच्या मागणीला जोर

14 जूनच्या सकाळी 9 ते 9.30 यादरम्यान सुशांतसंबंधीचं विकिपीडिया पेज अपडेट झालं होतं. त्याच्या आत्महत्येची बाब दुपारी 1 वाजता समोर आली. हे काय आहे गौडबंगाल?

  • Share this:

मुंबई, 1 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant singh Rajput) याच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. सुशांत सिंहच्या आत्महत्येची बाब 14 जून दुपारी 1 वाजता समोर आली. पण त्यापूर्वीच त्याच्यासंबंधीचं Wikipedia page कसं अपडेट झालं, असा प्रश्न आता विचारला जात आहे. यासंबंधी CBI ने चौकशी करावी अशी मागणीही होत आहे.

सध्या पोलीस या केसचा तपास करीत असले तरी दररोज नवनव्या गोष्टी समोर येत असल्याने यात मोठा हस्तक्षेप असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे चाहत्यांकडून सुशांत सिंह मृत्यूप्रकरणात सीबीआयची मागणी केली जात आहे. सुशांतच्या चाहत्यांनी यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी केली आहे.

सुशांत सिंह याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप चाहत्यांकडून लावला जात आहे. अभिनेता शेखर सुमन यानेही या प्रकरणात सीबीआयच्या तपासाची मागणी केली आहे. पत्रिका डॉट कॉमने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हे वाचा-Sushant Singh Suicide: वांद्रे पोलिसांकडून 'दिल बेचारा'मधील अभिनेत्रीची चौकशी

विकिपीडिया कसा झाला अपडेट?

मिळालेल्या माहितीनुसार 14 जूनच्या सकाळी 9 ते 9.30 यादरम्यान सुशांतचा विकिपीडिया पेज अपडेट झाला होता. यामध्ये सुशांतने आत्महत्या केल्याची बाब अपडेट करण्यात आली आहे. सुशांत सिंहच्या आत्महत्येची बाब 14 जून दुपारी 1 वाजता समोर आली. सुशांतचे चाहते सोशल मीडियावरील तो आयपी अड्रेसही शेअर करीत आहेत. यामध्ये सुशांतचा विकिपीडिया अपडेट झाला होता. विशेष म्हणजे ही अपडेट सकाळी 9.08 मिनिटांनी करण्यात आल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याची शक्यता वर्तवत सुशांतच्या चाहत्यांनी अमित शहा यांच्याकडे सीबीआयची मागणी केली आहे.

 

First published: June 30, 2020, 9:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading