सुशांत सिंह ब्रेकअप नंतर खचला होता; गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेपासून या कारणाने झाला होता वेगळा

सुशांत सिंह ब्रेकअप नंतर खचला होता; गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेपासून या कारणाने झाला होता वेगळा

सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे टीव्ही शो 'पवित्र रिश्ता' च्या सेटवर भेटले होते. या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या या दोन अभिनेत्यांमध्ये मैत्री आणि नंतर प्रेमाची सुरूवात झाली होती.

  • Share this:

मुंबई, 14 जून :  बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत (bollywoord actor Sushant Singh Rajput) याने आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह मुंबईच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये सापडला. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. मीडिया रिपोर्टनुसार त्याच्या घरात काम करणाऱ्याने सुशांतचा मृतदेह पंखाला लटकलेला पाहिला आणि त्याने पोलिसांना कळविले. सुशांत सिंगच्या मृत्यूच्या आलेल्या या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.

अजूनही त्याच्या मृत्यूवर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. सुशांत सिंह अवघ्या 34 वर्षांचा होता, अशा वयात असे काय झाले की त्याने आत्महत्येसारखे पाऊल उचलले.

तो केवळ आपल्या चित्रपटांमुळेच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होता. अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत त्याच्या ब्रेकअपमुळे खूप चर्चा सुरू होती. या ब्रेकअपनंतर अंकिता लोखंडे खूप दुःखी झाली होती. त्याचवेळी सुशांतसिंग राजपूतही तुटला होता. आपल्या आयुष्यातील इतक्या चांगल्या टप्प्यावर असताना दोघांचा ब्रेकअप झाला होता.  इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर जोडप्याचे ब्रेकअप का झाले.

जेव्हा सुशांत आणि अंकिताचा ब्रेकअप झाला तेव्हा बर्‍याच बातम्या समोर आल्या होत्या. या बातम्यांना उत्तर देताना सुशांतने स्वत: असे म्हटले होते की, नाही अंकिता मद्यपी आहे, नाही मी वुमेनायजर आहे. ब्रेकअप करण्याचे कारण सांगून तो म्हणाला की - 'लोक फक्त एकमेकांपासून दूर जातात .. आणि हे खूप दुर्दैवी आहे'.

सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे टीव्ही शो 'पवित्र रिश्ता' च्या सेटवर भेटले होते. या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या या दोन अभिनेत्यांमध्ये मैत्री आणि नंतर प्रेमाची सुरूवात झाली. ही बाब लग्नापर्यंत पोहोचली होती, पण या जोडप्याच्या अचानक ब्रेकअपमुळे बर्‍याच लोकांना दु:ख झालं.

हे वाचा-बिहारचा राहणारा होता सुशांत सिंह; काही दिवसांपूर्वीच कुटुंबीयाची घेतली होती भेट

First published: June 14, 2020, 3:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading