Home /News /entertainment /

Sushant Singh Rajput च्या फेसबुक पेजवरून मिळाल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा; चाहते झाले भावुक

Sushant Singh Rajput च्या फेसबुक पेजवरून मिळाल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा; चाहते झाले भावुक

चाहत्यांना काल सुशांत सिंह राजपूतच्या फेसबुक अकाऊंटवरून नववर्षाच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत.

    मुंबई, 2 जानेवारी-  बॉलिवूड  (Bollywood)  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या  (Sushant Singh Rajput)  निधनानंतर संपूर्ण देश हादरला होता. अभिनेत्याचे चाहते आजही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. आजही चाहते त्याच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करून आपलं प्रेम व्यक्त करत असतात. सोशल मीडियावर सुशांतचे अनेक व्हिडीओ आणि फोटो आपल्याला सतत पाहायला मिळतात. परंतु चाहते चाहत्यांना चकित करणारी एक गोष्ट घडली आहे. चाहत्यांना काल सुशांत सिंह राजपूतच्या फेसबुक अकाऊंटवरून नववर्षाच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. या शुभेच्छा सुशांतची बहीण   (Sushant's Sister)  श्वेता सिंह कीर्तीने  (Shweta Singh Kirti)   दिल्या आहेत. परंतु अभिनेत्याच्या अकाउंटवर या शुभेच्छा   (New Year Wishes)  पाहायला मिळाल्याने चाहते भावुक झाले आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या इतक्या दिवसानंतरही चाहते त्याच्या आठवणीत आहेत. सुशांतच्या मृत्यूला जवळजवळ दोन वर्ष होत आली आहेत. परंतु आजही चाहत्यांना हे कालच घडल्यासारखं वाटत. अभिनेचा मोठा चाहतावर्ग आहे. सुशांतचे चाहते सतत त्याचे जुने व्हिडीओ आणि फोटो शेअर करून आपल्या या लाडक्या अभिनेत्याचं स्मरण करत असतात. तर दुसरीकडे सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह किर्ती सतत त्याच्या आठवणी शेअर करत असते. दरम्यान काल नववर्षाच्या मुहूर्तावर श्वेताने सुशांतच्या फेसबुक अकाऊंटवरून त्याच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्वेताने सुशांतच्या पेजवरून अशी लिहिली पोस्ट- श्वेताने सुशांत सिंह राजपूतच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट शेअर करत लिहिलं आहे, सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.. मी श्वेता सिंह किर्ती आपल्या सगळ्यांना माझ्या भावाच्या वतीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते'. असं लिहीत श्वेताने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही पोस्ट पाहून चाहते फारच भावुक झाले आहेत. सुशांत सिंहच्या चाहत्यांनी या पोस्टवर प्रचंड कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं आहे, 'ये देवा माझं मन एकदमी धस्स झालं'. तर दुसऱ्याने लिहिलं, 'काही क्षणासाठी वाटलं तू खरंच परत आलास'. तर आणखी एकाने लिहिलं प्लिज परत ये'. तर आणखी दुसऱ्याने लिहिलं, 'आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक क्षणी प्रार्थना करतो'. सुशांत सिंह राजपूतने 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यामुळे त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्याने फारच कमी वेळेत बॉलिवूडमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. सुशांतने अल्पावधीतच अनेक हिट चित्रपट दिले होते. परंतु १४ जून २०२० ला अचानक त्याने उचललेल्या टोकाच्या पावलाने सर्वांना सुन्न करून सोडलं होतं. सुशांतने आत्महत्या केल्याचं दिसून आलं होतं. मात्र आजही सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरु आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Sushant sing rajput

    पुढील बातम्या