"सुशांतची हत्या झाली होती", आत्महत्येचा रिपोर्ट देणाऱ्या AIIMS च्या डॉक्टरांची AUDIO CLIP लीक

काही दिवसांपूर्वीच AIIMS ने सुशांत सिंह राजपूतने (Sushant singh rajput) आत्महत्या केल्याचं सांगितलं.

  • Share this:

मुंबई, 05 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (SUSHANT SINGH RAJPUT) प्रकरणाला आता पुन्हा वेगळं वळण मिळालं आहे. सुशांतने आत्महत्या केली असा रिपोर्ट देणाऱ्या एम्सच्या (AIIMS) डॉक्टरांची ऑडिओ क्लिप लीक झाली आहे. यामध्ये सुशांतची हत्या झाली असं सांगितलं जातं आहे. ही ऑडिओ क्लिप एम्सचे डॉ. सुधीर गुप्ता (Dr Sudhir gupta) यांची असल्याची सांगितली जाते आहे.

सुशांतच्या फॉरेन्सिक रिपोर्टचा अहवाल देणाऱ्या एम्सच्या समितीचे डॉ. सुधीर गुप्ता प्रमुख आहेत. टाइम्स नाऊने सुधीर गुप्ता यांची ऑडिओ क्लिप आपल्या हाती लागल्याचा दावा केला आहे. न्यूज 18 या ऑडिओ क्लिपची पुष्टी देत नाही. यामध्ये डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले, जेव्हा सर्वात आधी फोटो आपल्यासमोर आले तेव्हा ते पाहून सुशांतची हत्या झाली होती असंच वाटतं.  ही ऑडिओ टेप सुशांतचा फोटो पाहिल्यानंतरची असल्याचं सांगितलं जातं आहे.

सुशांतच्या कुटुंबियांनी आणि त्याच्या वकिलांनी सुशांतला आधी विष देऊन मारले आणि नंतर गळफास देण्यात आला असा आरोप केला होता. पण AIIMS च्या डॉक्टरांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास केला. सुशांतने आत्महत्याच केली असा रिपोर्ट एम्सच्या समितीने सीबीआयला सुपूर्द केला आहे. सुशांतच्या गळ्यावर असलेले ligature मार्क आणि शवविच्छेदनात स्पष्ट करण्यात आलेली मृत्यूची वेळ व इतर तथ्यांनुसार, सुशांतची हत्या झाली असावी असं म्हणता येणार नाही, असं डॉक्टरांच्या टीमने स्पष्ट केले आहे.

आता ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सुशांतच्या कुटुंबाने पुन्हा प्रश्न उपस्थित केला आहे. सुशांतची बहीण श्वेता किर्ती सिंहने याबाबत ट्वीट केलं आहे. "एम्सने असा यूटर्न का घेतला, याबाबत स्पष्टीकरण द्यावं", अशी मागणी श्वेताने केली आहे.

हे वाचा - रियाला त्रास देऊ नका, तिची सुटका करा; काँग्रेसच्या दिग्गज नेत्याने केली मागणी

सीबीआयकडून या संपूर्ण प्रकरणाबाबत काही माहिती देण्यात आलेली नाही. सीबीआयचं विशेष पथक सर्व बाजूने तपास करत आहे. एम्सच्या रिपोर्टशिवाय सीबीआय सीएफएसएल आणि एफएसएल रिपोर्ट्सचाही समावेश आहे. हे तिन्ही रिपोर्ट सुशांतच्या आत्महत्येचे संकेत देत आहे. शिवाय सीबीआय आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या अँगलनेही तपास करत आहे.

Published by: Priya Lad
First published: October 5, 2020, 1:46 PM IST

ताज्या बातम्या