2020 पर्यंत हॉलिवूड गाठण्याचं आणि LA मध्ये घर घेण्याचं होतं सुशांत सिंह राजपूतचं स्वप्न?

2013 मध्ये 'Kai Po Che' सिनेमातून पदार्पण करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) अवघ्या 7 वर्षात मोठा चाहता वर्ग कमावला होता. पण सुशांतचं स्वप्न फक्त बॉलिवूडपूरतं मर्यादित नव्हतं तर त्याला हॉलिवूडही गाठायचं होतं

2013 मध्ये 'Kai Po Che' सिनेमातून पदार्पण करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) अवघ्या 7 वर्षात मोठा चाहता वर्ग कमावला होता. पण सुशांतचं स्वप्न फक्त बॉलिवूडपूरतं मर्यादित नव्हतं तर त्याला हॉलिवूडही गाठायचं होतं

  • Share this:
    मुंबई, 10 डिसेंबर: यशस्वी होण्याचं मोठं स्वप्न उराशी बाळगून बॉलिवूडमध्ये (Bollywood) एंट्री घेतलेल्या सुशांतने (Sushant Singh Rajput) 14 जून रोजी जगाचा निरोप घेतला. पण बॉलिवूडंच नाही तर हॉलिवूडही जिंकण्याचं सुशांतचं स्वप्न होतं.‘आता फक्त बॉलिवूडमध्ये काम करायचं नाही, आपण इथे जी कामं करतोय ती आणि इतर चित्रपटांबद्दलच्या चर्चा लवकर पूर्ण करू आणि 2020 पर्यंत हॉलिवूड गाठू, हा आहे माझा प्लॅन,’असं सुशांत सिंह राजपूतने त्याच्या एका जवळच्या मित्राला म्हटलं होतं. दोन वर्षांपूर्वी 10 डिसेंबरला सुशांतचा केदारनाथ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाच्या शूटिंगवेळी त्याच्यासोबत असलेला मित्र विषाद दुबेने इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात त्याने असं लिहिलंय की सुशांतला या वर्षाअखेरीपर्यंत हॉलिवूडमध्ये काम करायचं होतं आणि लॉस एंजलिसमध्ये (LA) एक स्वप्नातलं घरही विकत घ्यायचं होतं.  या शूटिंगवेळच्या प्रसंगाबद्दल विषादने असं लिहलं आहे की, 'मला चार-पाच पुस्तकं वाचण्याचा 'होमवर्क' देऊन तो केदारनाथच्या शूटिंगला निघून गेला. दोन आठवड्यांनंतर त्याने एका डिमांडिग क्लायंटसारखा फोन केला. (चर्चा करून परतण्यासाठी) मी तयारी करायला सुरुवात केली. बॅगमध्ये काही कपडे घेतले आणि तीन दिवसांनी गौरीकुंडला (केदारनाथ) पोहोचलो. सुशांतला भेटलो.' (हे वाचा-धक्कादायक! प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या दत्तक मुलाची आई परतली, मागितला मुलाचा हक्क) त्याने पुढे असं लिहिलं आहे की, 'मी तिथं पोहचल्यानंतर साधारण दुसऱ्या रात्री आम्ही चर्चा करायला सुरुवात केली आणि तासभर चर्चा झाल्यावर तो म्हणाला, ऐक, आता फक्त बॉलिवूडमध्ये काम करायचं नाही, आता उरलेली कामं आणि चित्रपटांबद्दलच्या चर्चा लवकर आटपू आणि 2020 पर्यंत हॉलिवूड गाठू. हा बघ त्याचा डिटेल्ड प्लॅन'.
    विषाद पुढे लिहितो, 'नंतर त्याने त्याच्या स्वप्नातल्या एलएमधल्या घराचं स्केच दाखवलं. तात्पुरतं आम्ही त्या घराचं नाव ‘ओरियन’ ठरवलं.' त्यानंतर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करण्याची गरज आहे याबद्दल चर्चा केल्याचं विषादने लिहिलं आहे. विषादच्या पोस्टनुसार त्यावेळी सुशांतने त्याला तिथेच राहण्याचा आग्रह केला. तेव्हा विषादने त्याला म्हटलं होतं की, ‘भाई मी दोन-तीनच कपडे आणले आहेत इतक्या थंडीत कसा निभाव लागणार?’ तर सुशांतने हसून उत्तर दिलं होतं की, ‘अरे इतक्या थंडीत मी पाण्यात शूटिंग करतोय आणि तू एवढं नाही करू शकत? चल माझं जॅकेट वापर.' (हे वाचा-Drug Case मध्ये बॉलिवूडमधून आणखी एकाला अटक, NCB ने जप्त केलं कोकेन) हा प्रसंग सांगताना विषादने म्हटलं आहे की, ' आणि मला लक्षात आलं की तो एकटा राहू शकत नव्हता त्याला कुणाचीतरी सोबत हवी होती. नंतरचे दिवस म्हणजे आमच्या चर्चा, त्याचे कष्ट आणि शिवशंकराचा आशीर्वाद.’ केदारनाथचा दिग्दर्शक अभिषेक कपूर यांना धन्यवाद देत ही पोस्ट संपवली आहे.
    Published by:News18 Desk
    First published: