Home /News /entertainment /

सुशांत मारियुआना घेत होता; रिया चक्रवर्तीचा खळबळजनक दावा

सुशांत मारियुआना घेत होता; रिया चक्रवर्तीचा खळबळजनक दावा

SSR case : मनी लाँड्रिंगपासून ड्रग्जपर्यंतचे आरोप झाल्यानंतर रिया (Rhea chakraborty interview) प्रथमच माध्यमासमोर आली. तिने या मुलाखतीत खळबळजनक दावे केले आहेत.

    मुंबई, 27 ऑगस्ट : सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा (Sushant singh Rajput case) तपास नव्याने सुरू झाल्यानंतर रिया चक्रवर्तीवर (Rhea chakraborty interview) विविध आरोप होत आहेत. त्यातच रियाच्या whatsapp चॅटमध्ये ड्रग्जचा उल्लेख झाल्याने नार्कोटिक्स विभागानेही रिया चक्रवर्तीविरोधात तपास सुरू केला आहे. रियाने या सगळ्या आरोपांनंतर प्रथमच माध्यमासमोर आली आहे. आज तकला दिलेल्या मुलाखतीत रिया चक्रवर्तीने काही खळबळजनक दावेही केले आहेत. सुशांत मारियुआना घ्यायचा आणि त्याची ती सवय मोडावी म्हणून आपण प्रयत्न करत होतो, असा दावा रियाने या मुलाखतीत केला. राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या मुलाखतीत रिया चक्रवर्तीने सुशांतबरोबर मैत्री कशी झाली इथपासून सुरू करून थेट 14 जूनला नेमकं काय झालं इथपर्यंत अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला. तिच्यावर होत असलेल्या सगळ्या आरोपांचं खंडन करत ती म्हणाली, जो उठतो तो आरोप करतोय. आता मला आणि माझ्या कुटुंबाला माध्यमंच आता न्याय द्यायला बसली आहेत. विच हंट सुरू आहे, असा आरोप तिने केला. आता गोळी घालून मारून टाका आम्हाला... की आम्ही आत्महत्या करू? असंही तिने या मुलाखतीदरम्यान उद्वेगाने विचारलं. 'मी एका निरागस माणसावर निरागसपणे प्रेम केलं, त्याची केवढी शिक्षा मला मिळते आहे. माझ्या कुटुंबाला विनाकारण यात ओढलं जात आहे', असं रिया म्हणाली. सुशांतच्या पैशांवर युरोप ट्रिप केली आणि त्याच्या पैशावर चैन केल्याचे सगळे आरोप रियाने फेटाळून लावले. सुशांतला क्लॉस्ट्रोफोबिया होता. तो त्यावर मानसोपचार तज्ज्ञांनी दिलेली औषधं घेत होता, असं रिया म्हणाली. "हा क्लॉस्ट्रोफोबिया आहे?", अंकिताने VIDEO शेअर करत खोडून काढला रियाचा दावा गोव्याच्या रेस्टॉरंटचे मालक गौरव आर्य यांना संपर्क साधून ड्रगविषयी विचारणा करणाऱ्या कथित whatsapp चॅट बद्दल विचारण्यात आल्यावर रिया म्हणाली, "गौरव आर्य यांना मी ओळखते. पण त्याचा ड्रग्जशी काही संबंध नाही. आता नार्कोटिक्स डिपार्टमेंट याविषयी चौकशी करत आहे. त्यामुळे या विषयावर मी इथे काही बोलू शकत नाही." Exclusive video : रियाबरोबर ड्रग्जबाबत whatsapp chat बद्दल काय म्हणाला गौरव आर्य जया नावाच्या व्यक्तीकडून सुशांतच्या चहात कुठलं ड्रग घालायच्या गोष्टी केल्या होतात? ते संभाषणही व्हायरल झालं आहे, असं विचारल्यावर रियाने त्याचाही खुलासा केला. जया सुशांतची मैत्रीण होती. तिच्याच सांगण्यावरून सुशांतलाही चहातून ते ड्रग्ज हवं होतं. त्यानेच ते चहात घालून द्यायला सांगितलं.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या