Home /News /entertainment /

जेव्हा सुशांतला दिला होता आपला खांदा; PHOTO शेअर करत इमोशनल झाली संजना

जेव्हा सुशांतला दिला होता आपला खांदा; PHOTO शेअर करत इमोशनल झाली संजना

सुशांतच्या (sushant singh rajput) शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'मध्ये (dil bechara) त्याच्यासह काम करणाऱ्या संजनाला (sanjana sanghi) आता त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण आठवतो आहे.

  मुंबई, 27 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant singh rajput) आत्महत्येचा धक्का सर्वांनाच बसला आहे, अद्यापही कुणी या धक्क्यातून सावरलेलं नाही. अशात सुशांतच्या शेवटचा चित्रपट दिल बेचारा (dil bechara) चित्रपटातील अभिनेत्री संजना सांघीकडे (sanjana sanghi) तर सुशांतच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. त्याच्यासह काम करतानाचा प्रत्येक क्षण तिला आता आठवतो आहे. दिल बेचारा चित्रपट रिलीज झाल्यानंतर संजनाने फिल्ममध्ये सुशांतसह आपल्या सर्वात आवडत्या क्षणाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये सुशांतने संजनाच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवलं आहे आणि तो शांत झोपला आहे. हा क्षण आठवून संजना पुन्हा भावुक झाली आहे.
  दिल बेचारा चित्रपटातील गाणं तारे गिनच्या शूटिंगदरम्यानचा हा क्षण आहे. या फोटो शेअर करताना संजनाने पोस्ट केली की, "पहाटे 4.30 वाजचा तारे गिनच्या रात्रीच्या शूटवेळी मॅनीने पॉवर नॅप घेतली, किझीने त्याला आपला खांदा उधार दिला आणि नेहमीप्रमाणे ती आपल्याच विचारात मग्न झाली". या क्षणाला तिनं सेटवरील सर्वात आवडता क्षण असल्याचं म्हटलं आहे" हे वाचा - सुशांत आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती आला महत्त्वाचा फॉरेन्सिक रिपोर्ट सुशांतचा दिल बेचारा (dil bechara) चित्रपट डिज्नी प्लस हॉट स्टारवर24 जुलैला  रिलीज झाला. हा चित्रपट 2014 च्या  'फॉल्ट इन आर स्टार्स' या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. स्वत: गंभीर आजाराने ग्रस्त असतानाही आनंदाने आयुष्य जगत गंभीर आजाराने ग्रस्त दुसऱ्या व्यक्तीलाही जगायला शिकवणाऱ्या मॅनीची ही कहाणी. किझी बासू म्हणजे संजना सांघी कॅन्सरशी लढत असते. तिच्या आयुष्यात डान्सर इम्मानुअल राजकुमार ज्युनिअर उर्फ मॅनी म्हणजेच सुशांतची एंट्री होते. किझी गंभीर आणि शांत तर सुशांत हसमुख आणि बिनधास्त भूमिकेत आहे. हे वाचा - साहेबांना त्रास नको म्हणून करणला समन्स नाही? कंगनाने आदित्य ठाकरेंना केलं लक्ष्य किझीचं दु:ख कमी करण्यासाठी मॅनी शक्य ते सर्व प्रयत्न करतो. तिला आयुष्याचं खरं महत्त्वं समजावतो. केजीला जगायला शिकवणारा मॅनीच केजीच्या जगण्याचं कारण बनतो. मॅनीदेखील कॅन्सरग्रस्त आणि दिव्यांग असतो. मात्र तरी तो हसतखेळत जगत असतो. मॅनी जसं हसत केजीच्या आयुष्यात एंट्री घेतो तशीच एक्झिटही घेतो. मॅनीला तो एकटं सोडून जगाचा निरोप घेतो मात्र जाताना तिला जगणं शिकवून जातो. चित्रपटाचा हा शेवट मनाला चटका लावणारा आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Sushant Singh Rajput

  पुढील बातम्या