सुशांतबद्दल धक्कादायक नवी माहितीसमोर, जन्मदात्या बापासोबत असा वागायचा जणू...

सुशांतबद्दल धक्कादायक नवी माहितीसमोर, जन्मदात्या बापासोबत असा वागायचा जणू...

सुशांत फक्त आपल्या एका बहिणीशी जास्त संपर्कात असायचा. एवढंच नाहीतर जन्मदात्या वडिलांसोबतही तो विचित्र वागत होता.

  • Share this:

मुंबई, 05 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. सुशांतचे त्याच्या कुटुंबियांशी पटायचे नाही. आपल्या जन्मदात्याच वडिलांसोबतच तो दूर राहत होती, अशी माहितीसमोर आली आहे.

सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणावरून राजकारण तापले आहे. पण, पोलीस तपासातून हळूहळू त्याच्याबद्दलच नवी माहिती आता त्याच्या कुटुंबीयांनी प्रकाशात आणली आहे. सुशांतच्या बहिणीचे पती ओ पी सिंग यांच्यासोबत सुशांतचे तर अजिबातच पटायचे नाही. तर दुसरीकडे सुशांत त्याच्या वडिलांना बोलणे तर दूर तो फक्त एसएमएस द्वारेच उत्तर द्यायचा.

कंगनाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, म्हणाली..आधी वडिलांना विचारा 7 प्रश्नांची उत्तरं

सुशांत फक्त आपल्या एका बहिणीशी जास्त संपर्कात असायचा आणि रिया प्रमाणेच सुशांतचे अंकितासोबत असलेले संबंध ओ पि सिंग यांना आवडत नव्हते. त्यांना वाटायचे या प्रेम प्रकरणांमुळे सुशांत कुटुंबीयांना टाळतोय. ओ पी सिंग जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा त्यांनी तत्कालीन बांद्रा डीसीपी परमजीत सिंग दहिया यांच्याकडून सुशांतला भेटायला दबाव टाकला आणि 3 दिवसात फक्त एकदाच सुशांत ओ पी सिंग यांना भेटला.

तर चंदीगड येथे येण्यासाठी सुशांतची बहिण आणि ओ पी सिंग यांनी त्यांच्यावर दबाव टाकला, त्यांनी जबरदस्तीने सुशांतचे विमान तिकिट बुक केले. पण सुशांतने ते तिकीट रद्द करुन स्वत:च्या गाडीने चंदीगडला गेला आणि फक्त एका दिवसातच परत मुंबईला आला.

दिनो मोर्याने नारायण राणेंना ठरवलं खोटं, केला महत्त्वाचा खुलासा

सुशांत सिंग राजपूत प्रकरणी मुंबई पोलियांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुशांतच्या कुटुंबीयांनी बिहार पोलिसात तक्रार दाखल केली आणि बिहार पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जाऊ लागले. पण आता मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांच्या विरोधात माहिती समोर आणली आहे.

दरम्यान, पुढील ३ दिवसात मुंबई पोलीस आपला तपास अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहेत तर आम्ही अजून पर्यंत कुणालाच क्लीन चीट दिली नाही. कारण, आमचा तपास सुरू आहे अशी माहिती मुंबई पोलिस दलातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Published by: sachin Salve
First published: August 5, 2020, 6:08 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading