पोलिसांनी सुशांतचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. सुशांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता कोणतीही सुसाईट नोट आढळली नाही, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. प्राथमिक तपासात नैराश्यातून सुशांतने आत्महत्या केली, असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. सुशांतची सुसाईड नोट नाही, पण आत्महत्या प्रकरणाची अशी होणार चौकशी गेल्या काही दिवसात बॉलिवूडला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. अनेक मोठ्या सेलेब्रिटींनी अनपेक्षितपणे जगाचा निरोप घेतला आहे. सुरुवातीला इरफान खान आणि ऋषी कपूर यांनी दुर्धर आजाराशी झुंज देत शेवटी हार पत्करली. त्यानंतर साजिद- वाजिद या संगीतकार जोडीतले वाजिद खान यांचं कोरोनाव्हायरसमुळे निधन झालं. सुशांतच्या आत्महत्येमुळे हिंदी फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. अनेकांनी हा मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. संपादन - सचिन साळवे#SushantSinghRajput सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या, पोलिसांनी घेतला मृतदेह ताब्यात #SushantSinghRajput #SushantSingh pic.twitter.com/0fiJ6SW5qA
— News18Lokmat (@News18lokmat) June 14, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sushant Singh Rajput