सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला एक महिना पूर्ण; 30 दिवसांत काय काय झालं?

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला एक महिना पूर्ण; 30 दिवसांत काय काय झालं?

असा एकही दिवस नसेल की कुणाला सुशांत सिंह राजपूतचा (sushant singh rajput) विसर पडला असेल.

  • Share this:

मुंबई, 14 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आपल्यातून निघून गेला याला आज एक महिना पूर्ण झाला. सुशांतच्या आत्महत्येला 30 दिवस झाले. मात्र असा एकही दिवस नाही की त्याच्या जवळच्या व्यक्तींनी, चाहत्यांनी त्याची आठवण काढली नसेल. इतके दिवस झाले मात्र अजूनही सुशांत आपल्यात आता नाही यावर कुणाचाच विश्वास बसत नाही. त्याचा मृत्यूला एक महिना उलटल्यानंतर सुशांतच्या आठवणी अधिकच ताज्या झाल्यात आणि सर्वांचे डोळे पुन्हा पाणवलेत.

सुशांतच्या मृत्यूचा सर्वात मोठा धक्का बसला तो त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला. सुशांतच्या आत्महत्येनतंर तिनं सोशल मीडियावर पहिल्यांदाच एक पोस्ट शेअर केली आहे. तिने देवासमोर लावलेल्या एका दिव्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने 'Child of God' असे कॅप्शन दिले आहे.

View this post on Instagram

CHILD Of GOD 😇

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

अंकिताच्या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. तिला खंबीर राहण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला आहे. 'तो कायम तुझ्याबरोबर आहे', अशा कमेंटही काही युजर्सनी केल्या आहेत. अंकिता सुशांतच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या मुंबईतील घरी कुटुंबाला भेटायला गेली तेव्हा दिसली होती.

हे वाचा - सुशांतच्या कुकची पुन्हा झाली 6 तास चौकशी,बहिणीचाही दुसऱ्यांदा नोंदवला जाणार जबाब

अभिनेत्री रिया चक्रवर्तीनेदेखील सुशांतबरोबरचा फोटो शेअर केला आहे. अजूनही मी माझ्या भावनांशी लढत आहे, असं रियाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अनेकांनी तिच्या दु:खात सहभागी असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र त्यापेक्षा जास्त अनेकांनी तिला ट्रोल केले आहे.

View this post on Instagram

Still struggling to face my emotions.. an irreparable numbness in my heart . You are the one who made me believe in love, the power of it . You taught me how a simple mathematical equation can decipher the meaning of life and I promise you that I learnt from you every day. I will never come to terms with you not being here anymore. I know you’re in a much more peaceful place now. The moon, the stars, the galaxies would’ve welcomed “the greatest physicist “with open arms . Full of empathy and joy, you could lighten up a shooting star - now, you are one . I will wait for you my shooting star and make a wish to bring you back to me. You were everything a beautiful person could be, the greatest wonder that the world has seen . My words are incapable of expressing the love we have and I guess you truly meant it when you said it is beyond both of us. You loved everything with an open heart, and now you’ve shown me that our love is indeed exponential. Be in peace Sushi. 30 days of losing you but a lifetime of loving you.... Eternally connected To infinity and beyond

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty) on

अभिनेत्री रिया आणि सुशांतच्या अफेअरच्या चर्चा बॉलिवूडमध्ये होत्या. त्यांनी उघडपणे त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केले नव्हते. रिया आणि सुशांत काही काळासाठी एकत्र देखील राहत होते. दरम्यान सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात रियाची चौकशी देखील मुंबई पोलिसांकडून करण्यात आली होती. सुशांतसह रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिनं सांगितलं, तसंच आत्महत्येच्या काही दिवस आधीच तिने त्याचे घर सोडल्याची माहिती देखील समोर आली होती. याशिवाय तिने अनेक धक्कदायक खुलासे केलेत.

हे वाचा - सुशांतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीने पहिल्यांदाच शेअर केला दोघांचा हा फोटो

सुशांतचा शेवटचा चित्रपट दिल बेचाराचे दिग्दर्शक आणि सुशांतचे मित्र मुकेश छाबडा यांनीही भावुक पोस्ट केली आहे. एक महिना झाला... आता तर तुझा कधीच फोनही येणार नाही, अशी पोस्ट त्यांनी केली.

मुकेश छाबडा यांचीही पोलिसांनी चौकशी केली. सुशांत सोबत आपला कुठलाही वाद नव्हता त्याच्याशी चांगले संबंध होते अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हे वाचा - 'दिल बेचारा'तील अभिनेत्रीसह रोमँटिक डान्स; सुशांत सिंह राजपूतचा Unseen Video

दिल बेचारा चित्रपटातील सुशांतची सहअभिनेत्री संजना सांघवीदेखील सुशांतला विसरू शकली नाही. संजनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली आहे. तिनं यामध्ये सुशांतच्या स्वप्नांचा उल्लेख केला आहे आणि ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू असंही तिनं सांगितलं आहे.

या चौकशीत संजनाला सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सुशांतवर लावण्यात आलेल्या मी टू आरोपांबद्दल आणि त्याच सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सुशांत डिप्रेशनमध्ये जाण्यासंबंधी अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले. संजनानं पोलिसांनी दिलेल्या जबाबानुसार तिने सुशांतवर कोणत्याही प्रकारचे मीटू संबंधी आरोप लावले नव्हते किंवा तिच्यासोबत प्रत्यक्षात अशी कोणतीही घटना घडली नव्हती. तसंच त्याच्या पर्सनल लाइफ बद्दल तो कोणासोबतच बोलला नव्हता. फक्त त्याच्या कुटुंबीयांचे विनोदी किस्से आमच्या सर्वांसोबत शेअर करत असे. बाकी आमचं बोलणं फिल्मपुरतंच असायचं असं तिनं सांगितलं.

हे वाचा - करण जोहरचं सोशल मीडियावर प्रायव्हेट अकाऊंट? सेलिब्रिटी करतायेत फॉलो

14 जूनला सुशांतने मुंबईतील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तो डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती समोर आली. वैयक्तिक आयुष्य, करिअर की आणखी कोणत्या कारणामुळे सुशांतनं असं पाऊल उचललं याचा तपास सुरू आहे. पोलीस वेगवेगळ्या मार्गाने तपास करत आहेत.

Published by: Priya Lad
First published: July 14, 2020, 5:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading