सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी कंगनाला चौकशीसाठी बोलावले? वाचा काय आहे अभिनेत्रीची प्रतिक्रिया

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी कंगनाला चौकशीसाठी बोलावले? वाचा काय आहे अभिनेत्रीची प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसात अशा बातम्या समोर आल्या होत्या की, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) जो तपास सुरू आहे, त्याकरता चौकशीसाठी कंगना रणौतला बोलावण्यात आले आहे.

  • Share this:

मुंबई, 03 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)च्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूड बिथरले होते. या घटनेनंतर इंडस्ट्रीतील मोठमोठे दिग्दर्शक, निर्माते आणि स्टार किड्स सुशांतच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेकांनी देखील या सर्वांवर नेपोटिझमचा आरोप करत, त्यांना सुशांतच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) देखील नेपोटिझम (Nepotism) चा मुद्दा उचलून धरत बॉलिवूडमधील अनेकांना लक्ष्य केले होते. तिने व्हिडीओ जारी करून तिची याबाबतची मतं मांडली होती. दरम्यान यानंतर तिला अनेक चाहत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. या सर्व प्रकारादरम्यान अशा बातम्या समोर आल्या होत्या की, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) जो तपास सुरू आहे, त्याकरता चौकशीसाठी कंगना रणौतला बोलावण्यात आले आहे. मात्र कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अशी माहिती दिली आहे की, मुंबई पोलिसांनी तिला चौकशीसाठी बोलावले नाही आहे.

(हे वाचा-सरोज खांन यांनी सुशांतसाठी लिहिलेली 'ती' पोस्ट ठरली अखेरची!)

गेल्या काही दिवसांपासून अशा बातम्या होत्या की, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी कंगनाला बोलावण्यात येणार आहे. सोशल मीडियावर कंगनाच्या टीमने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी ट्वीट करून अशी माहिती दिली आहे, 'मुंबई पोलिसांकडून कंगना रणौतला अशी कोणतीही विनंती करण्यात आलेली नाही, मात्र असे काही असल्यास ती स्वेच्छेने सहकार्य करेल'.

सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगनाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून बॉलिवूडमधील नेपोटिझमवर भाष्य केले होते. सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडमधील याच गोष्टी जबाबदार असल्याचे कंगनाने म्हणणे होते. तिने असा सवाल केला होता की, सुशांतचा मृत्यू हा योजनाबद्ध पद्धतीने केलेला खून तर नाही ना?

सुशांतच्या आत्महत्येनंतर तब्बल 30 जणांची चौकशी करण्यात आली आहे. मात्र अद्यापही सुशांतनं आत्महत्या का केली याचे कारण मुंबई पोलिसांना सापडले नाही आहे. आता सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी अनेक बड्या मंडळींची देखील मुंबई पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे.

(हे वाचा-प्रदर्शनाआधी 'सडक 2' सोशल मीडियावर ट्रोल, त्रस्त झालेल्या आलियाने केलं हे काम)

डीसीपी प्रणय अशोक यांनी न्यूज18 ला दिलेल्या माहितीनुसार आज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणातील तपासात ज्यांची नावं समोर येतील, त्यांना मुंबई पोलीस चौकशीसाठी बोलावेल अशी प्रतिक्रिया प्रणय अशोक यांनी दिली आहे.

संकलन, संपादन - जान्हवी भाटकर

First published: July 3, 2020, 12:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading