मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

"सुशांतने आत्महत्या केली यावर माझा विश्वास नाही", सुशांतच्या डॉक्टरांचा VIDEO

"सुशांतने आत्महत्या केली यावर माझा विश्वास नाही", सुशांतच्या डॉक्टरांचा VIDEO

सुशांतसारख्या अभिनेत्याने आत्महत्या केली असावी यावर अद्यापही कुणाचा विश्वास बसत नाही आहे.

सुशांतसारख्या अभिनेत्याने आत्महत्या केली असावी यावर अद्यापही कुणाचा विश्वास बसत नाही आहे.

सुशांतसारख्या अभिनेत्याने आत्महत्या केली असावी यावर अद्यापही कुणाचा विश्वास बसत नाही आहे.

नवी दिल्ली, 28 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येला आता महिनाभरापेक्षा अधिक काळ उलटला आहे. सुशांतसारख्या अभिनेत्याने आत्महत्या केली असावी यावर अद्यापही कुणाचा विश्वास बसत नाही आहे. अभिनेता कंगना रणौतने तर थेट सुशांतची हत्याच झाली आहे असा आरोप केला आहे आणि आता सुशांतच्या डॉक्टरांनीदेखील सुशांतने आत्महत्या केली यावर आपला विश्वास बसत नाही, असं म्हटलं आहे. सुशांतवर उपचार करणारे डॉक्टर रजी अहमद यांनी सुशांत आत्महत्या करू शकतो यावर विश्वास नाही, असं म्हटलं आहे. झारखंडमध्ये 'महेंद्र सिंह धोनीः द अनटोल्ड स्टोरी'च्या शूटिंगवेळी सुशांतला इन्फेक्शन झालं होतं, तेव्हा डॉ. रजी यांनी त्याच्यावर उपचार केले होते. न्यूज 18 हिंदीच्या फेसबुक लाइव्हमध्ये डॉ. रजी म्हणाले, जेव्हा सुशांतशी त्यांची पहिली भेट झाली तेव्हा त्यांच्या मनात एक भीती होती की इतका मोठा स्टार आहे. मात्र सुशांत त्यांना भेटला तेव्हा त्याने डॉक्टरांना अभिवादन केलं. त्यांना उपचारासाठी पूर्ण तपासणी करू दिली. सुशांतल्या भेटल्यानंतर सुशांत माणूस म्हणून किती चांगला आहे हे त्यांना समजलं. सुशांतसारखा व्यक्ती इतकं मोठं पाऊल उचलू शकतो यावर मला विश्वास नाही. त्यामुळे सुशांतच्या मृत्यूचा तपास योग्य पद्धतीने व्हावा असंच मला वाटतं, असं डॉ. रजी म्हणाले. हे वाचा - वडिलांच्या FIR नंतर सुशांत प्रकरणाला मोठी कलाटणी; रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप सुशांतच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. आतापर्यंत मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र आता पाटणा पोलीसही याप्रकरणी तपास करणार आहेत. आतापर्यंत मौन बाळगलेले सुशांतचे वडील कृष्णा सिंह यांनी पाटणा पोलिसात एफआयआर दाखल केली आहे. हे वाचा - कंगनाचा मोठा आरोप; सुशांतच्या मृत्यूच्या 2 दिवसांपूर्वी रियासह महेश भट झाले गायब बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्तक्षेपानंतर ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे.  त्यामध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये या प्रकरणी पोलिसांत दाखल केल्यानंतर आता पाटण्याचे पोलीस मुंबईत येऊन थडकले आहेत.
First published:

Tags: Sushant Singh Rajput

पुढील बातम्या