Home /News /entertainment /

सुशांत सिंह राजपूतच्या सर्वात हिट फिल्ममागील मराठी कनेक्शन

सुशांत सिंह राजपूतच्या सर्वात हिट फिल्ममागील मराठी कनेक्शन

सुशांत सिंह राजपूत याने 'एम.एस धोनी द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटात महेंद्र सिंगची भूमिका साकारली होती.

    मुंबई, 14 जून : 'माही मार रहा' म्हणत सुशांत सिंह राजपूतने भारतीय टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची भूमिका साकारून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सुशांतच्या कारकिर्दीतला हा सर्वात मोठा आणि यशस्वी सिनेमा ठरला. या सिनेमासाठी सुशांतने प्रचंड मेहनत घेतली होती. यात खारीचा वाटा होता एका मराठी माणसाचा. सुशांत सिंह राजपूत याने  'एम.एस धोनी द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटात महेंद्र सिंगची भूमिका साकारली होती. धोनी ज्या प्रकारे बॅटिंग करत होता, तीच स्टाईल सुशांतची पाहण्यास मिळाली होती. यासाठी मेहनत घेतली होती ती माजी ज्येष्ठ क्रिकेटपटू किरण मोरे यांनी. किरण मोरे यांनी सुशांतला सिनेमासाठी क्रिकेटचे धडे शिकवले होते. सुशांतच्या आत्महत्येमुळे किरण मोरे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. सुशांतच्या आत्महत्येमुळे किरण मोरे यांना धक्का बसला आहे. किरण मोरे यांनी सुशांतच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे. आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास सुशांतने आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याच्या घरी त्याचे मित्रही आले होते. दुपारी तो आपल्या खोलीत गेला, त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातील नोकराला सुशांतने गळफास घेतल्याचं आढळून आलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सुशांतच्या घरी धाव घेतली. Sushant Suicide! ...अब शहर भर जिक्र मेरी खुदकुशी का, अनेकांच्या काळजाला धक्का पोलिसांनी सुशांतचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. सुशांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता कोणतीही सुसाईट नोट आढळली नाही, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. प्राथमिक तपासात नैराश्यातून सुशांतने आत्महत्या केली, असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी सुशांतचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. गेल्या काही तासांत सुशांत कुणासोबत बोलला, कुणाला त्याने कोणते कोणते मॅसेज केले, याचा तपास सध्या सुरू आहे. जे घरं कमवलं, तिथेच घेतला शेवटचा श्वास, सुशांतचा मृतदेह नेतानाचा शेवटचा VIDEO गेल्या काही दिवसात बॉलिवूडला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. अनेक मोठ्या सेलेब्रिटींनी अनपेक्षितपणे जगाचा निरोप घेतला आहे. सुरुवातीला इरफान खान आणि ऋषी कपूर यांनी दुर्धर आजाराशी झुंज देत शेवटी हार पत्करली. त्यानंतर साजिद- वाजिद या संगीतकार जोडीतले वाजिद खान यांचं कोरोनाव्हायरसमुळे निधन झालं. सुशांतच्या आत्महत्येमुळे हिंदी फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. अनेकांनी हा मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या