SSR Death Case: आत्महत्येआधी सुशांत सतत सर्च करत होता 'या' तीन गोष्टी, पोलीस अधिकाऱ्याचा दावा

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी दिवसेंदिवस गूढ वाढतच चाललं आहे. कारण बॉलिवूडमधील एका गटामुळे सुशांतने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप होत असतानाच आता सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्याविरोधातही आरोपांची राळ उठली आहे.

एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याने असा दावा केला आहे की, सुशांत आत्महत्येच्या एक आठवडाआधी सतत तीन गोष्टी गुगल सर्च करत होता.

  • Share this:
    मुंबई, 03 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput case) मृत्यू प्रकरणाबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याधीच ही आत्महत्या असल्याचे जाहीर केले होते. मात्र सुशांतचे कुटुंबीय आणि बिहार पोलीस हे मान्य करण्यास तयार नाही आहेत, त्यामुळे आता बिहार पोलीस याप्रकरणी नवा तपास करत आहेत. या सगळ्यात आता मुंबई पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याने असा दावा केला आहे की, सुशांत आत्महत्येच्या एक आठवडाआधी सतत तीन गोष्टी गुगल सर्च करत होता. सुशांत गुगलवर सर्च करत असलेल्या गोष्टी या- न्यूज रिपोर्टमध्ये आपलं नाव, त्याची मॅनेजर दिशा सालियनचे नाव आणि आपल्या आजाराबाबत. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याने असा दावा केला आहे की, 14 जून रोजी म्हणजेच आत्महत्येच्या दिवशी सुशांतने गुगलवर आपले नाव सर्च केले होते.अधिकाऱ्याने दावा केले आहे की, ही माहिती सुशांतच्या मोबाइल आणि लॅपट़ॉपच्या फॉरेन्सिक रिपोर्टमधून समोर आली आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या एक आठवडाआधीच त्याची पूर्व मॅनेजर दिशा सालियनने आत्महत्याकेली होती. वाचा-सुशांतच्या कूकचा खळबळजनक खुलासा, रियाच्याच हातात होतं फायन्शियल कंट्रोल! आतापर्यंत 40 लोकांचा जबाब नोंदवला सुशांतच्या मृत्यूप्रकरणी आतापर्यंत 40 लोकांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तसेच, सुशांतच्या अकाउंटमधून काढण्यात आलेले पैसे हे दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाले आहे. सुशांतच्या अकाउंटमधून गेल्या वर्षी सर्वात जास्त 2.5 कोटी रुपयांची रक्कम ट्रान्सफर झाली होती. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत तीन मानसोपचार तज्ज्ञांचा जबाबही नोंदवला आहे. वाचा-राजकीय फायद्यासाठी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राजकारण- गृहमंत्री काय होता कुटुंबियांचा जबाब? पोलिसांच्या मते सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याचे वडील केके सिंह, बहिण नीतू आणि मितू सिंह यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. तेव्हा त्यांनी कोणावरही आरोप केले नव्हते. पोलिसांनी असा दावा केला आहे की, या प्रकरणाची प्रोफेशनल रायव्हलरी अंतर्गत तपासणी केली जाईल.
    Published by:Priyanka Gawde
    First published: