सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मोठी बातमी; आता सलमानची होऊ शकते चौकशी

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मोठी बातमी; आता सलमानची होऊ शकते चौकशी

सुशांत सिंह राजपूतने मुंबईत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला आज बरोबर एक महिना होत असतानाच या प्रकरणातली मोठी बातमी आली आहे.

  • Share this:

आशिष सिंह/ मुंबई, 14 जुलै : सुशांत सिंह राजपूतने मुंबईत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला आज बरोबर एक महिना होत असतानाच या प्रकरणातली मोठी बातमी आली आहे. प्रसिद्ध अभिनेता सलमान खानची सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी चौकशी होऊ शकते.

14 जूनला सुशांतने मुंबईतील राहत्या घरात त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तो डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती समोर आली. वैयक्तिक आयुष्य, करिअर की आणखी कोणत्या कारणामुळे सुशांतनं असं पाऊल उचललं याचा तपास सुरू आहे. पोलीस वेगवेगळ्या मार्गाने तपास करत आहेत.

हे वाचा-सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला एक महिना पूर्ण; 30 दिवसांत काय काय झालं?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येमुळे संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या आत्महत्येमागे कट-कारस्थान असल्याचे सांगत चाहत्यांकडून सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुशांत सिंहच्या आत्महत्येचा तपास सुरू आहे. यामध्ये त्याच्या एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेसह अनेक त्याचे सहकलाकार, मित्र आणि नातेवाईकांचा समावेश आहे. त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

हे वाचा-लॉकडाऊनमध्ये सलमान खानने शेतात गाळला घाम; भाईजानची अशी झाली अवस्था

सुशांत सिंह प्रकरणात आता अभिनेता सलमान खान याची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणात उद्या सलमान खान याला समन्स जारी केला जाऊ शकतो. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात अभिनेता सलमान खान याची माजी व्यवस्थापक रेश्मा शेट्टी हिचा जबाब नोंदविण्यात आला होता.

हे वाचा-सुशांतच्या कुकची पुन्हा झाली 6 तास चौकशी,बहिणीचाही दुसऱ्यांदा नोंदवला जाणार जबाब

आता सलमान खान याचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान आपल्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत सुशांत सिंह राजपूत याला घेऊन एक चित्रपटाची निर्मिती करणार होता. मात्र काही कारणाने सुशांत राजूपतच्या विवादानंतर सलमान खानने हा चित्रपट करणार नसल्याचे कळते.

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: July 14, 2020, 10:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading