सुशांतबद्दल 'तो' प्रश्न विचारताच रिया भडकली? CBI चौकशीत महत्त्वाची घडामोड

सुशांतबद्दल 'तो' प्रश्न विचारताच रिया भडकली? CBI चौकशीत महत्त्वाची घडामोड

सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती हिला वारंवार आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई, 30 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील चौकशीदरम्यान सीबीआयच्या महिला अधिकारी आणि सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) यांच्यात वाद झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सुशांतबाबत विचारलेल्या एका प्रश्नावर रियाने आक्षेप घेतला. मात्र तपासाच्या दृष्टीने या प्रश्नाचं उत्तर गरजेचं आहे, असं सीबीआय अधिकाऱ्याने सांगितलं आणि त्यांची रियासोबत बाचाबाची झाली.

नेमक्या कोणत्या प्रश्नावर उत्तर देणं रियाने टाळलं?

सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती हिला वारंवार आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात येत आहे. सुशांतने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्यास रियाच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सीबीआयकडून गेल्या काही दिवसांपासून रियाची कसून चौकशी करण्यात येत आहे.

सीबीआयने शनिवारी देखील रियाला चौकशीसाठी बोलावलं होतं. यावेळी एका महिला सीबीआय अधिकाऱ्याने रियाला तिच्या सुशांतसोबतच्या प्रेम प्रकरणावर प्रश्न विचारले. रिया आणि सुशांत 2 महिने एका फार्म हाऊसवर राहिले होते. तुम्ही दोघं रिलेशनशीपमध्ये होता तर तू अचानक घर सोडून का गेलीस? तेव्हा नेमकं काय घडलं होतं? त्यानंतर सुशांतने केलेले फोनही तू उचलले नाहीत, त्यामागे काय कारण होतं? अशा प्रश्नांची सरबत्ती सीबीआय अधिकाऱ्यांकडून रियावर करण्यात आली.

या प्रश्नांनंतर सीबीआय़ अधिकारी आणि रियामध्ये काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. कारण ते माझं खासगी आयुष्य आहे...त्याबद्दल मला उत्तर द्यायचं नाही, असं म्हणत रियाने या प्रश्नांना उत्तर द्यायचं टाळलं.

सुशांतच्या अकाऊंटमधून कुठे गेले पैसे?

सुशांतचे वडील केके सिंह (KK Singh) यांनी देखील अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर तिने सुशांतचे पैसे लाटल्याचा आरोप केला आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी सुशांतच्या बँक खात्याचा (Mumbai Police) फॉरेन्सिक ऑडिट अहवाल ईडी (ED) आणि सीबीआयकडे (CBI) सोपवला आहे. यामधून काही मोठे खुलासे झाले आहेत. ग्रांट थॉर्टन या कंपनीच्या ऑडिट अहवालानुसार सुशांत हा रिया आणि तिच्या कुटुंबावर पैशांची उधळपट्टी करत असल्याचे समोर येत आहे. मात्र त्याच्या खात्यातून रियाच्या खात्यामध्ये कोणतेही इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन झाले नाही.

Published by: Akshay Shitole
First published: August 30, 2020, 6:11 PM IST

ताज्या बातम्या