मुंबई, 04 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा (Sushant Singh Rajput Suicide)तपास अद्याप अंतिम टप्प्यामध्ये आलेला नाही. या प्रकरणी आता त्या हिरव्या कपड्याच्या क्षमतेची तपासणी होणार आहे. खरंच सुशांतने त्या कपड्याचा वापर करून आत्महच्या केली का याबाबत तपास केला जाणार आहे. यामध्ये त्या कपड्याची क्षमता सुशांतचे वजन पेलावणारी होती का, याबाबत तपास केला जाणार आहे. 14 जून रोजी, ज्यादिवशी सुशांतने आत्महत्या कली त्यादिवशी जेव्हा पोलीस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्याचा मृतदेह खाली उतरवण्यात आला होता. मृतदेह लटकताना पोलिसांनी पाहिले नाही. सुशांतच्या घरामध्ये जे व्यक्ती उपस्थित होते, त्यांनी असा जबाब दिला होता की सुशांतने आत्महत्या केली आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतने पंख्याला लटकून फाशी घेण्यासाठी हिरव्या रंगाच्या नाईट गाऊनचा वापर केला होता.
(हे वाचा-
सोनू निगमच्या 'त्या' वक्तव्यावर भडकला मिका सिंग, भूषण कुमारचे केले समर्थन)
एका तपास अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्या गाऊनचे फॉरेन्सिक विश्लेषण करण्यासाठी सायन्स लॅबमध्ये पाठवले आहे आणि अंतिम अहवाल येण्यासाठी आणखी 3-4 दिवस जातील.
दरम्यान सोमवारी दिग्दर्शक निर्माते संजय लीला भन्साळी यांची देखील चौकशी होणार आहे. शुक्रवारी एका पोलीस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वांद्रे पोलिसांनी भन्साळी यांना समन्स देखील जारी केले आहे. सोमवारी त्यांचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. दरम्यान याआधी अशी माहिती मिळाली होती की त्यांची चौकशी शुक्रवारी होणार आहे.
(हे वाचा-
'मनात आला होता आत्महत्येचा विचार पण...','आऊटसायडर' असणाऱ्या मनोज वाजपेयीची कहाणी)
त्यांनी अशी माहिती दिली की, व्यावसायिक दुश्मनीबाबत तपास करण्याबरोबरच पोलीस अभिनेत्याचे नैराश्यात जाण्याचे कारण देखील शोधत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भन्साळी यांनी सुशांतला काही चित्रपट ऑफर केले होते, मात्र त्याचे एका मोठ्या निर्माता कंपनीबरोबर कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे तारखांअभावी त्याला भन्साळी बॅनरखाली चित्रपट करता आला नाही. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार याबाबत तपास केला जात आहे की, कोणत्या परिस्थितीमध्ये सुशांतने हे पाऊल उचलले. पोलिसांनी सुशांतचे कुटुंबीय, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाबडा, यशराजचे कास्टिंग डिरेक्टर शानू शर्मा, अभिनेत्री संजना सांघी, सुशांतचा मित्र आणि क्रिएटिव्ह मॅनेजर सिद्धार्थ यांच्यासह एकूण 30 लोकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.