Home /News /entertainment /

‘त्याच्या आत्महत्येला हेच लोक कारणीभूत...’ सुशांतच्या निधनानंतर कंगनाला राग अनावर; पाहा VIDEO

‘त्याच्या आत्महत्येला हेच लोक कारणीभूत...’ सुशांतच्या निधनानंतर कंगनाला राग अनावर; पाहा VIDEO

कंगाना रणौतनं सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येसाठी नेपोटिझम आणि बॉलिवूडकरांना जबाबदार धरलं आहे.

  मुंबई, 15 जून : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सुशांतनं वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला. नैराश्यात सुशांतनं असं टोकाचं पाऊल उचलल्या बोललं जात आहे. त्याच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी त्याला श्रद्धांजली वाहिली. सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगाना रणौतनं सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिनं सुशांतच्या आत्महत्येला नेपोटिझम आणि बॉलिवूडकरांना जबाबदार धरत त्याच्या आत्महत्येला हेच लोक कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. कंगनानाच्या टीमनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती सांगते, सुशांतच्या जाण्यानं सर्वांना धक्का बसला आहे. पण काही लोकांना त्याच्या आत्महत्येचा वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. ते असं सांगत आहेत की, त्याची मानसिक स्थिती ठिक नव्हती. जो व्यक्ती रँक होल्डर आहे त्याची मानसिक स्थिती कशी बिघडते. त्याच्या मागच्या काही मुलाखती पाहा पोस्ट पाहा ज्यात त्यांनी लोकांना अपील केलं आहे त्याचे सिनेमा पाहण्यासाठी त्यानं हे सुद्धा सांगितलं होतं की, माझे सिनेमा पाहा नाही तर मला या इंडस्ट्रीमधून बाहेर काढलं जाईल.
  कंगणा पुढे सांगते, छिछोरे सारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमाला एकही अवार्ड मिळत नाही आणि गली बॉय सारख्या सिनेमाला अनेक अवॉर्ड मिळतात. अनेकांनी त्याच्यावर चुकीचे आर्टिकल लिहिले होते. यांना संजय दत्तची व्यसनं दिसत नाहीत पण त्यांनी सुशांतला व्यसनी म्हटलं होतं. अनेक लोक मला मेसेज करतात की, तुझा कठीण काळ आहे तू चुकीचं पाऊल उचलू नकोस. याचा अर्थ असा की, या इंडस्ट्रीतले लोक अशाप्रकारे फिल्मी बॅकग्राउंड नसलेल्या कलाकारांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करतात. सुशांतनं असं खचून जाऊन त्यांना बरोबर आणि स्वतःला चुकीचं सिद्ध करायला नको होतं. कंगनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. कंगना नेहमीच बॉलिवूडमधल्या नेपोटिझमबद्दल बोलत आली आहे. अनेकदा यावरून वादही झाले आहे. छिछोरे नंतर सुशांतकडे 7 सिनेमा होते मात्र ते सिनेमा एक-एक करून त्याच्या हातून निसटले. त्यामुळे तो सुद्धा नेपोटिझमची शिकार झाल्याचं बोललं जात आहे.
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Kangana ranaut, Sushant Singh Rajput

  पुढील बातम्या