मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी रियाबाबत मोठी बातमी आली समोर, पोलिसांना मिळाले बँक डिटेल्स

सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी रियाबाबत मोठी बातमी आली समोर, पोलिसांना मिळाले बँक डिटेल्स

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांसमोर सुशांत सिंह राजपूतचे बँक डिटेल्स मिळाले आहेत. यातून अभिनेत्री रिया चक्रवर्ती संदर्भात नवीन माहिती समोर येत आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
आशिष सिंह, मुंबई, 17 जुलै : अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या (Sushant Singh Rajput Suicide) प्रकरणी काही नवीन खुलासे पोलिसांसमोर आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांसमोर सुशांतचे बँक डिटेल्स मिळाले आहेत. News18 च्या सूत्रांनुसार पोलिसांच्या हाती ही माहिती लागली आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या 11 महिन्यांच्या डिटेल्सनुसार सुशांत सिंह राजपूतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) सुशांतच्या क्रेडिट कार्डवरून शॉपिंग केले होते. सुशांतच्या क्रेडिट, डेबिट कार्डवरून तिने शॉपिंग केले आहे. एवढेच नव्हे तर गेल्यावर्षीच्या युरोप टूरचा खर्च देखील सुशांतच्या बँक अकाउंटमधूनच झाला होता. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्ती गेल्या महिनाभरामध्ये सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. मोठ्या प्रमाणात तिला ट्रोल देखील करण्यात येत आहे. गुरुवारी तिने सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी देखील मागणी केली होती, त्यानंतर देखील रियाला ट्रोल करण्यात आले होते. सुशांतची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीनेदेखील ((rhea chakraborty) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे ही मागणी केली आहे. रियाने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. (हे वाचा-अभिनेत्रीच्या नावाने अपलोड केले गेले अश्लील VIDEO, तिने ट्विटरवर घेतली शाळा) 14 जूनला सुशांतने मुंबईतील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. दरम्यान त्याच्या आत्महत्याप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी ही मागणी जोर धरू लागली आहे. अभिनेता शेखर सुमन, भाजप नेत्या रूपा गांगुली, डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्यानंतर आता रियानेदेखील सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
रिया गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर देखील चर्चेत आहे ते म्हणजे तिच्या पोस्टमुळे. सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीआधी देखील तिने एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने तिला मिळणारा बलात्काराच्या आणि खुनाच्या धमक्यांबात सायबर सेलकडे तक्रार केली होती.
First published:

Tags: Bollywood, Mumbai police, Sushant Singh Rajput

पुढील बातम्या