Sushant Singh Rajput Suicide: वांद्रे पोलिसांकडून 'दिल बेचारा'मधील अभिनेत्रीची चौकशी

Sushant Singh Rajput Suicide: वांद्रे पोलिसांकडून 'दिल बेचारा'मधील अभिनेत्रीची चौकशी

'दिल बेचारा' या सिनेमात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर अभिनेत्री संजना सांघी स्क्रीन शेअर करणार आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात संजनाचा देखील जबाब नोंदवला जाणार आहे.

  • Share this:

मुंबई, 30 जून : सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येबाबत मुंबई पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात एकूण 27 जणांचा जबाब नोंदवून घेतला आहे. दरम्यान सुशांतचा शेवटचा सिनेमा  ओटीटी प्लॅटफॉर्मवर पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. 'दिल बेचारा' (Dil Bechara) या सिनेमात सुशांतबरोबर अभिनेत्री संजना सांघी (Sanjana Sanghi) स्क्रीन शेअर करणार आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात संजनाचा देखील जबाब नोंदवला जाणार आहे. परिणामी संजनाला वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये (Bandra Police Station) बोलावण्यात आले होते. हा जबाब नोंदवण्यासाठी संजना वांद्रे पोलीस स्थानकात दाखल झाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांना संजनाकडून सुशांतच्या स्वभावाबाबत काही माहिती जाणून घ्यायची आहे.

'दिल बेचारा' हा सुशांतचा शेवटचा चित्रपट आहे. या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान सुशांतच्या स्वभावात काही बदल जाणवले का हे विचारण्यासाठी संजनाची चौकशी झाली.  14 जून रोजी सुशांत सिंह राजपूत या हरहुन्नरी कलाकाराने वांद्रे याठिकाणी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.

(हे  वाचा-'त्याने ऑस्कर जिंकला असता' सुशांतच्या आत्महत्येवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया)

सुशांतने अनेक दर्जेदार चित्रपट केले. सुशांतने 'काय पो चे', 'शुद्ध देसी रोमान्स', 'एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी', 'पीके', 'राबता', 'केदारनाथ', 'सोनचिडिया' या चित्रपटात काम केले आहे. त्याने साकारलेला धोनी सर्वांच्या स्मरणात राहील. मात्र सुशांत सिंह राजपूत हा चेहरा 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) या बालाजी टेलिफिल्म्सच्या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचला. यामध्ये त्याने मानव ही मुख्य भूमिका निभावली होती. त्याआधी 2008 मध्ये त्याने बालाजीची 'किस देश मे रहता है मेरा दिल' या मालिकेतून अभिनयाची सुरूवात केली होती. कालांतराने लोकप्रियता मिळवल्यानंतर सुशांतने 'काय पो चे'च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

(हे वाचा-सुशांतला बहिण श्वेता सिंह किर्तीने केलं शेवटचं अलविदा! शेअर केली भावुक पोस्ट)

सुशांत नितेश तिवारी यांच्या 'छिछोरे' या चित्रपटात शेवटचा दिसला. मुख्य म्हणजे हा चित्रपट देखील आत्महत्येचे विचार कसे दूर लोटले पाहिजे, त्यांच्याशी कसा सामना केला पाहिजे यावर आधारित होता.

दरम्यान सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक प्रश्नांना वाचा फुटली आहे. चाहत्यांनी त्याचप्रमाणे काही बॉलिवूड कलाकारांनी देखील त्याच्या मृत्यूस नेपोटिझमला जबाबदार धरले आहे. अभिनव सिंह कश्यप, कंगना रणौत, कोएना मित्रा, अनुभव सिन्हा, निर्माता निखिल दिवेदी त्याचप्रमाणे हेअर स्टायलिस्ट सपना मोती भवनानी आणि खेळाडू बबीता फोगट यांनी देखील नेपोटिझमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही कलाकारांनी तर स्वत:चा अनुभव देखील शेअर केला आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: June 30, 2020, 4:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading