मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सुशांत मृत्यू प्रकरणाच्या तपासाबाबत एक्स गर्लफ्रेंड अंकिता म्हणाली, "अखेर ती वेळ आलीच"

सुशांत मृत्यू प्रकरणाच्या तपासाबाबत एक्स गर्लफ्रेंड अंकिता म्हणाली, "अखेर ती वेळ आलीच"

सुशांत कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू शकत नाही. त्यांनी यामागे कोणावरही आरोप केला नसला तरी या प्रकरणात कडक तपासाची मागणी केली आहे.

सुशांत कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू शकत नाही. त्यांनी यामागे कोणावरही आरोप केला नसला तरी या प्रकरणात कडक तपासाची मागणी केली आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या (sushant sing rajput suicide case) तपासाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. या सुनावणीत जी माहिती देण्यात आली, त्यावर अंकिता लोखंडेने (ankita lokhande) प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 05 जुलै : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput) अनेकांनी सीबीआय चौकशीची (CBI investigation) मागणी केली होती. आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या प्रत्येकाने याबाबत आभार मानले आहेत. या निर्णयानंतर विशेषत: सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने (ankita lokhande) ट्वीट केलं आहे. "ज्या वेळेची प्रतीक्षा होती ती वेळ अखेर आलीच", असं ट्वीट अंकिताने केलं आहे. याशिवाय तिनं हात जोडून आभारही मानले आहेत.
  View this post on Instagram

  Gratitude 🙏🏻 #sushantsinghrajput

  A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

  सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय तपास व्हावा अशी मागणी सोमवारी बिहार सरकारने केंद्र सरकारकडे केली होती. याप्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी होत होती. त्यावेळी केंद्र सरकारने बिहार सरकारची मागणी मान्य केली आहे, अशी माहिती केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टात दिली. याबाबत केंद्र सरकार लवकरच अधीसूचना काढणार आहे. हे वाचा - सुशांत सिंह राजपूत प्रकरणी SC ने मुंबई पोलिसांना 3 दिवसांत मागितला अहवाल दुसरीकडे, सुप्रीम कोर्टात बुधवारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी झाली. बिहारमधील खटला मुंबई ट्रान्सफर करण्याची मागणी रियाच्या वकिलांनी केली आहे.  सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकार चौकशीचा अहवाल पुढील तीन दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात सर्व बाजू आपल्या लेखी उत्तरांत देण्याचे कोर्टानं आदेश दिले आहेत. यानंतर सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय देईल. कोण चौकशी करेल आणि कुठले राज्य करणार यावर निर्णय देईल. हे वाचा - कंगनाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, म्हणाली..आधी वडिलांना विचारा 7 प्रश्नांची उत्तरं सुनावणी दरम्यान, तुषार मेहता यांनी सांगितलं की, "रियानं सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेला आता काही अर्थ नाही. रियाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून बिहारमधील खटला मुंबईत ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहे. मात्र, बिहारमध्ये चौकशी होणार नाही कारण, बिहारने आता या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली आहे"
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Sushant Singh Rajput

  पुढील बातम्या