सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, दिग्दर्शक मुकेश छाबडांची 7 तास चौकशी; दिली ही माहिती

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, दिग्दर्शक मुकेश छाबडांची 7 तास चौकशी; दिली ही माहिती

मुकेश छाबडा हे सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरलेल्या ‘दिल बेचारा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. सैफ अली खान आणि सुशांत सिंह राजपूत यांची मुख्य भूमिका त्यात आहे.

  • Share this:

मुंबई 17 जून: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आता चौकशीला सुरुवात झाली आहे. मुंबई पोलिसांचं एक खास पथक ही चौकशी करत आहे. आज दिग्दर्शक मुकेश छाबडा यांची आज पोलिसांनी तब्बल 7 तास चौकशी केली. डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्या नेतृत्वाखाली तीन अधिकाऱ्यांनी ही चौकशी केली. सुशांतसोबत कसे संबंध होते याचा खुलासा त्यांनी पोलसांच्या चौकशीत केला.

मुकेश छाबडा हे सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरलेल्या ‘दिल बेचारा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. सैफ अली खान आणि सुशांत सिंह राजपूत यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट मे 2020मध्ये रिलीज होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे तो पुढे ढकलण्यात आला.

सुशांत सोबत कुठलाही वाद नव्हता त्याच्याशी चांगले संबंध होते अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

दरम्यान, बॉलिवूड दिग्दर्शक शेखर कपूर यांन सांगितलं की, काही महिण्यांपूर्वी सुशांत सिंह राजपूत त्यांच्यासोबत 'पानी' या सिनेमावर काम करत होता. पण काही व्यवसायिक कारणांनी हा सिनेमा शूट होऊ शकला नाही. शेखर कपूर आणि सुशांत यांच्यात सिनेमाबाबत तासंतास चर्चा होत असत. जेव्हा सिनेमा शूट होणार नाही असं कळलं तेव्हा सुशांत शेखर कपूर यांना फोन करून ढसाढसा रडला होता.

सुरज पंचोली-सुशांत सिंह राजपूत यांच्यात होता वाद? वाचा काय आहे सत्य

सुशांतच्या निधनानंतर शेखर कपूर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये सुशांतला इंडस्ट्रीतल्या कोणत्या व्यक्तींमुळे त्रास झाला असं म्हटलं होतं. त्यांनतर अनेक चाहत्यांनी त्यांना या लोकांची नावं विचारली होती. ज्यावर आता शेअर कपूर यांनी उत्तर दिलं आहे. शेखर कपूर यांनी सुशांतच्या निधनानंतर त्याच्या आठवणीत ट्वीट केलं होतं.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध सेलिब्रेटींविरोधात तक्रार, एकता कपूर भडकली

त्यांनी लिहिलं, मला माहित आहे, तू कोणत्या दुःखातून जात होतास. मला माहित आहे कोणी तुला अपमानीत केलं होतं. तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडला होतास. किती बरं झालं असतं जर मागचे सहा महिने मी तुझ्या सोबत असतो किंवा तू माझ्यापर्यंत पोहोचू शकला असतास. जे झालं ते त्या लोकांचं कर्म होतं, तुझं नाही.

संपादन - अजय कौटिकवार

First published: June 17, 2020, 8:09 PM IST

ताज्या बातम्या