सुशांतच्या बहिणीने तिच्या मुलाला सांगितले की 'आता मामा आपल्यात नाही', अशी होती त्याची रिअ‍ॅक्शन

सुशांतच्या बहिणीने तिच्या मुलाला सांगितले की 'आता मामा आपल्यात नाही', अशी होती त्याची रिअ‍ॅक्शन

सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती अमेरिकेमध्ये राहते, भावाच्या जाण्याने तिचे दु:ख कल्पने पलीकडील आहे. मात्र तरी देखील श्वेताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सर्वांना खंबीर राहण्याचा संदेश दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अकाली जाण्याने संपूर्ण बॉलिवूड हादरले आहे. नैराश्यातून सुशांतने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्याच्या आत्महत्येबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, त्याचबरोबर त्याच्या मृत्यूसाठी अनेक गोष्टींना जबाबदार देखील धरलं जात आहे. त्याच्या जाण्याने बॉलिवूड आणि त्याच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र त्याची बहिण यावेळी सर्वांना हिंमत राखण्याची विनंती करत आहे. सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती अमेरिकेमध्ये राहते, भावाच्या जाण्याने तिचे दु:ख कल्पने पलीकडील आहे. मात्र तरी देखील श्वेताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सर्वांना खंबीर राहण्याचा संदेश दिला आहे.

(हे वाचा-सुशांतने आत्महत्येपूर्वी ट्विटरवर दिले संकेत? व्हायरल होतायेत स्क्रिनशॉट)

या पोस्टमध्ये तिने एक विशेष घटना देखील नमूद केली आहे. तिच्या मुलाबरोबर झालेलं संभाषण तिने या पोस्टमध्ये सांगितलं आहे. ती म्हणते आहे की, जेव्हा मी माझा मुलगा निर्वाण सांगितलं की मामा आता आपल्यात राहिले नाही तेव्हा तो म्हणाला की 'पण तो तुमच्या हृदयात अजूनही जिवंत आहे'. हे वाक्य तो 3 वेळा म्हणाला असंही श्वेताने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. जर पाच वर्षाचा मुलगा अशी बाब बोलतो तेव्हा विचार करा आपण किती खंबीर आहोत, असंही श्वेता यावेळी म्हणाली.

सुशांतच्या बहिणेने त्याच्या फॅन्सना असा संदेश दिला आहे की, तो आपल्या हृदयात अजूनही जिवंत आहे आणि तो तिथे कायम राहील. कृपया त्याच्या आत्म्याला त्रास होईल असं कुणीही वागू नका, खंबीर राहा.

(हे वाचा-सुशांतने आत्महत्येपूर्वी ट्विटरवर दिले संकेत? व्हायरल होतायेत स्क्रिनशॉट)

14 जून रोजी सुशांतने अखेरचा श्वास घेतला. त्यावर 15 जून रोजी मुंबईतील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या आवडत्या कलाकाराला, मित्राला अलविदा करण्यासाठी बॉलिवूड कलाकार उपस्थित होते.

First published: June 17, 2020, 8:50 AM IST

ताज्या बातम्या