सुशांत सिंह राजपूतला बहिण श्वेता सिंह किर्तीने केलं शेवटचं अलविदा! शेअर केली भावुक पोस्ट

सुशांत सिंह राजपूतला बहिण श्वेता सिंह किर्तीने केलं शेवटचं अलविदा! शेअर केली भावुक पोस्ट

सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने तिच्या फेसबुक अकाउंटवरून प्रार्थना सभेचा एक फोटो शेअर केला आहे. त्यावेळी श्वेताने आपल्या लाडक्या भावासाठी एक भावुक मेसेज लिहून त्याला अलविदा केले आहे.

  • Share this:

मुंबई, 30 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)च्या जाण्याचे दु:ख पचवणे अजून अनेकांसाठी कठीण आहे. त्याच्या जाण्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याच्या चाहत्यांनी बॉलिवूडवरच सवाल उपस्थित केले आहेत. त्याच्या आत्महत्येसाठी मोठ्या दिग्गज कलाकारांना देखील जबाबदार धरण्यात येत आहे. या सर्वामध्ये सुशांतच्या कुटुंबीयांचे दु:ख अनाकलनीय आहे. सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने तिच्या फेसबुक अकाउंटवरून प्रार्थना सभेचा एक फोटो शेअर केला आहे. त्यावेळी श्वेताने आपल्या लाडक्या भावासाठी एक भावुक मेसेज लिहून त्याला अलविदा केले आहे.

सुशांतच्या बहिणिने सुशांतसाठी फेसबुकवर एक पोस्ट लिहली आहे. त्याच्या आत्म्यास शांती मिळावी याकरता प्रार्थना करणारा मेसेज श्वेताने लिहिला आहे.

(हे वाचा-सुशांतला सलमान खानने दिली होती धमकी; गायकाचा VIDEO तून धक्कादायक आरोप)

सुशांतच्या  बहिणीने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. यामध्ये श्वेताने असे म्हटले आहे की, 'माझ्या छोट्या भावाला प्रेम आणि सकारात्मकतापूर्ण अलविदा. आशा आहे की तु जिथे असशील तिथे नेहमी खूश राहशील. आमचे तुझ्यावर शेवटपर्यंत असेच प्रेम राहिल.'

श्वेताने याआधी सुशांतसाठी लिहिलेल्या काही पोस्ट सोशल मीडियावरून डीलिट केल्या आहेत. सुशांतच्या बहिणीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करून त्यांचे दु:ख वाटून घेण्याचा प्रयत्न केला आहे.  सुशांतच्या आत्म्याच्या शांतीसाठी सर्वांनी प्रार्थना केली आहे.

(हे वाचा-सुशांत तू असं का केलं? धोनीची भूमिका साकारली मात्र त्याला समजू शकला नाहीस)

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील वांद्रे याठिकाणी त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोस्ट मार्टम अहवालानुसार गळफास घेतल्यानंतर श्वास कोंडल्यामुळे सुशांतचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा आणखी खोलात जाऊन तपास करत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 27 जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. सुशांतचे चाहते तसंच काही बॉलिवूड सेलिब्रिटी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करत आहेत.

First published: June 30, 2020, 11:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading