सारासोबत काम करण्यास सुशांत सिंग राजपूतचा नकार, काय आहे नेमकं कारण

'केदारनाथ' सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांचं सूत जुळल्याच्याही चर्चा होत्या.

  • Share this:

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने (Sushant Singh Rajput) सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंगची (Amrita Singh) मुलगी सारा अली खानसोबत (Sara Ali Khan) पुन्हा एकदा काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

विशेष म्हणजे सारा आणि सुशांतने 'केदारनाथ' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. याच सिनेमातून साराने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांचं सूत जुळल्याच्याही चर्चा होत्या.

आई अमृता सिंगच्या सांगण्यावरून सारा सुशांतसोबत अंतर ठेवून राहू लागली. अखेर सुशांत आणि सारा आपल्या आयुष्यात पुढे निघून गेले मात्र त्यांच्यातली कटुता काही कमी झाली नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, सुशांतला एका जाहिरातीत सारासोबत काम करण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र सुशांतने जाहीरातीत काम करण्यास स्पष्ट नकार दिला.

रिपोर्टनुसार, सुशांतला कोणत्याही परिस्थितीत एक्ससोबत काम करायचे नाही. याशिवाय अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत सुशांत नात्यात असल्याचं म्हटलं जात आहे. दोघांना अनेकदा एकत्र फिरताना आणि डिनरला जाताना पाहण्यात आलं आहे. तर साराचंही कार्तिक आर्यनसोबत अफेअर असल्याच्या चर्चा आहेत.

मागच्या वर्षी रिलीज झालेला सुशांतचा 'छिछोरे' सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमातील सुशांतच्या भूमिकेचं विशेष कौतुक केलं गेलं.

सारा अली खान इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव्ह आजकल' सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमात तिनं कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन शेअर केली आहे. याशिवाय ती वरुण धवनसोबत 'कुली नंबर वन' सिनेमात दिसणार आहे.

साराचे आतापर्यंत दोन सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. फार कमी वेळात साराने आपलं स्थान सिनेसृष्टीत प्रस्थापित केलं. टॉप यंग अभिनेत्रींमध्ये तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2020 10:44 PM IST

ताज्या बातम्या