• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • SSR Case: आज रियाचा आणखी एक धक्कादायक चॅट उघड, CBI चौकशीत झाला मोठा खुलासा

SSR Case: आज रियाचा आणखी एक धक्कादायक चॅट उघड, CBI चौकशीत झाला मोठा खुलासा

चौकशीमध्ये रियाचे आणखी एक चॅट उघड झालं आहे. या माहितीमुळे सुशांतच्या हत्येला नवं वळण लागलं आहे.

  • Share this:
मुंबई, 31 ऑगस्ट : अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करणार्‍या सीबीआय टीमने आज पुन्हा एकदा रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू केली आहे. यामध्ये रियाकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. रियाचं अंमली पदार्थ तस्करीत बॉलिवूड कनेक्शन उघडकीस आलं असल्याची माहिती समोर येत आहे. चौकशीमध्ये रियाचे आणखी एक चॅट उघड झालं आहे. या माहितीमुळे सुशांतच्या हत्येला नवं वळण लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका हॉटेल व्यावसायिकाशी रियाने चॅट केलं होतं. चॅटींगमध्ये रियाने अंमली पदार्थांबाबत चौकशी केली असल्याची माहिती उघड झाली आहे. इतकंच नाही तर संबंधित हॉटेल व्यावसायिक हा बॉलिवूड अभिनेत्रीचे हॉटेल चालवतो असंही समोर आलं आहे. या चौकशीमुळे आणखीनच खळबळ उडाली आहे. पिंपरीमध्ये दारू पार्टीत झाला वाद, तिघांनी डोक्यात बेसिन घालून केला मित्राचा खून तर या हॉटेल व्यावसायिकालादेखील इडीने चौकशी करता बोलावलं होतं. यानुसार तोदेखील इडी कार्यालायात चौकशी करता दाखल झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, सीबीआयच्या महिला अधिकारी आणि सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) यांच्यात वाद झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आहे. सुशांतबाबत विचारलेल्या एका प्रश्नावर रियाने आक्षेप घेतला. मात्र, तपासाच्या दृष्टीने या प्रश्नाचं उत्तर गरजेचं आहे, असं सीबीआय अधिकाऱ्याने सांगितलं आणि त्यांची रियासोबत बाचाबाची झाली. बहिणीच्या 13 दिवसांच्या लेकीला भावानेच संपवलं, कारण पाहून पोलीसही हैराण नेमक्या कोणत्या प्रश्नावर उत्तर देणं रियाने टाळलं? सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती हिला वारंवार आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात येत आहे. सुशांतने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्यास रियाच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सीबीआयकडून गेल्या काही दिवसांपासून रियाची कसून चौकशी करण्यात येत आहे. महाविकास आघाडीचा वाद चव्हाट्यावर, ठाण्यात लागलेल्या बॅनरनं राजकीय खळबळ सीबीआयने शनिवारी देखील रियाला चौकशीसाठी बोलावलं होतं. यावेळी एका महिला सीबीआय अधिकाऱ्याने रियाला तिच्या सुशांतसोबतच्या प्रेम प्रकरणावर प्रश्न विचारले. रिया आणि सुशांत 2 महिने एका फार्म हाऊसवर राहिले होते. तुम्ही दोघं रिलेशनशीपमध्ये होता तर तू अचानक घर सोडून का गेलीस? तेव्हा नेमकं काय घडलं होतं? त्यानंतर सुशांतने केलेले फोनही तू उचलले नाहीत, त्यामागे काय कारण होतं? अशा प्रश्नांची सरबत्ती सीबीआय अधिकाऱ्यांकडून रियावर करण्यात आली. या प्रश्नांनंतर सीबीआय़ अधिकारी आणि रियामध्ये काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. कारण ते माझं खासगी आयुष्य आहे. त्याबद्दल मला उत्तर द्यायचं नाही, असं म्हणत रियाने या प्रश्नांना उत्तर द्यायचं टाळलं.
Published by:Renuka Dhaybar
First published: