Home /News /entertainment /

"13 जूनला सुशांत-रिया भेटले होते, साक्षीदार सापडला"; श्वेता सिंह किर्तीकडून मोठा खुलासा

"13 जूनला सुशांत-रिया भेटले होते, साक्षीदार सापडला"; श्वेता सिंह किर्तीकडून मोठा खुलासा

8 जूनला सुशांत सिंह राजपूतचं (Sushant singh rajput) घर सोडल्यानंतर सुशांतशी आपला संपर्क झाला नाही असं सांगणाऱ्या रिया चक्रवर्तीविरोधात (rhea chakaraborty) महत्त्वाचा असा हा पुरावा आहे.

    मुंबई, 01 ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू (sushant singh rajput) प्रकरणाला आता दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी  उलटून गेला आहे. सीबीआयच्या तपासाला वेग आहे. याप्रकरणात आता मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. आता आणखी एक माहिती समोर येते आहे ती म्हणजे सुशांतच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी रिया आणि सुशांतची भेट झाली होती, हे सांगणारा साक्षीदार सापडला आहे. सुशांतची बहीण श्वेता किर्ती सिंहने हा मोठा खुलासा केला आहे. श्वेता किर्ती सिंहने एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये तिनं म्हटलं आहे. "ही गेमचेंजर बातमी आहे. रिया माझ्या भावाला 13 जूनच्या रात्री भेटली होती, हे सांगणारा एक साक्षीदार आहे. 13 जूनच्या रात्री नेमकं काय झालं होतं, ज्यानंतर दुसऱ्या दिवशी 14 जूनला सकाळी माझा भाऊ मृतावस्थेत सापडला?" रियाने आपण 8 जूनला सुशांतचं घर सोडलं. तेव्हा त्याची बहीण मीतू त्याच्यासोबत राहायला आली होती. त्यानंतर सुशांतला मी भेटलेच नाही, असं रियाने सांगितलं. मात्र आता श्वेता सिंह किर्तीच्या या ट्वीटमुळे खळबळ उडाली आहे. हा साक्षीदार म्हणजे सीबीआयच्या तपासात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. हे वाचा - रिया चक्रवर्तीचा 10 वर्षांचा तुरुंगवास अटळ? घरात सापडलं तब्बल दीड किलो DRUG दुसरीकडे या प्रकरणाचा ड्रग्ज अँगलने तपास करणाऱ्या एनसीबीला रियाच्या घरातून दीड किलो ड्रग्ज जप्त केलं आहे. यामध्ये चरस आणि गांजा आहे. यामुळे आता रिया आणि तिचा भाऊ शोविकला 10 ते 20 वर्षे तुरुंगवास होऊ शकतो, अशी माहिती तपास अधिकाऱ्याने दिल्याचं वृत्त दैनिक भास्करने दिलं आहे. रिया आणि शोविकच्या घरातून किती ड्रग्ज सापडलं आहे, हे त्यांच्या वकिलांनाही माहिती नाही, असंदेखील या अधिकाऱ्यानं सांगितलं. हे वाचा - 'हॅश है क्या?' ड्रग्जबाबत विचारणाऱ्या ट्रोलरलाच अभिषेक बच्चनने केलं ट्रोल ड्रग्ज घेतल्याने आणि त्याचा व्यवहार केल्याने रियाला 9 सप्टेंबरला अटक करण्यात आली. 6 ऑक्टोबरपर्यंत तिला न्यायालयीन कोठडी सुनाण्यात आली आहे. रिया आणि शोविकच्या जामीन याचिकेवर 29 सप्टेंबरला त्यांच्या याचिकेवर सुनावणी झाली.  मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. याबाबत कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. हा निर्णय येण्याआधीच रियाच्या घरात ड्रग्ज सापडले आहे. एनसीबीला मोठा पुरावा सापडला आहे. त्यामुळे रियाच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या