Home /News /entertainment /

सुशांतच्या रिअल लाइफचा UNSEEN VIDEO; आयुष्याचा प्रत्येक क्षण कसा जगायचा पाहा

सुशांतच्या रिअल लाइफचा UNSEEN VIDEO; आयुष्याचा प्रत्येक क्षण कसा जगायचा पाहा

हा व्हिडीओ पाहून सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आठवणीत तुम्ही पुन्हा भावुक व्हाल.

  मुंबई, 15 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे (sushant sing rajput) अनेक व्हिडीओ आपण आजवर पाहिलेत. त्याच्या मृत्यूनंतर फक्त रिल लाइफमधीलच नव्हे तर रिअल लाइफमधीलदेखील त्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. आता सुशांतच्या खऱ्या आयुष्याचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत सुशांत आयुष्यातील प्रत्येक्ष क्षण कसा जगायचा हे दिसून येतं. सुशांत आपल्यातून निघून गेला आता एक महिना पूर्ण झाला. अनेक चाहत्यांनी त्याचे फोटो, व्हिडीओ शेअर करून त्याला श्रद्धांजली दिली. सुशांतच्या जवळच्या व्यक्ती, बॉलीवूडमधील कलाकारांनी त्याच्या आठवणी जागवल्या. अशाच आठवणी ताज्या केल्यात त्या अभिनेता अली गोनीने. त्याने सुशांतचा व्हिडीओ शेअर करून त्याला श्रद्धांजली दिली आहे. यामध्ये सुशांत प्रत्येक क्षणाचा आनंद घेताना दिसत आहे.
  View this post on Instagram

  #RIPsushantSinghRajput

  A post shared by ~ علی گونی (@alygoni) on

  14 जूनला सुशांतने मुंबईतील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. याप्रकरणी सध्या पोलीस तपास सुरू आहे. हे वाचा - त्यावेळी सुशांतला कुणी वगळलं होतं? PM मोदी-बॉलिवूड भेटीवरून रूपा गांगुलींचा सवाल सुशांतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा ऑनलाईन रिलीज होणार आहे. 24 जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट पाहता येणार आहे. दिग्दर्शक आणि सुशांतचे मित्र मुकेस छाबरा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. सुशांतसह या चित्रपटात अभिनेत्री संजना सांघी दिसणार आहे. सुशांतच्या चाहत्यांना हा चित्रपट ऑनलाइन मोफत पाहता येणार आहे. म्हणजे सस्‍क्राइबर और नॉन सस्‍क्राइबर सर्व जण ही फिल्म पाहू शकतात.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Sushant sing rajput

  पुढील बातम्या