सुशांत भरत होता अंकिताच्या घराचा हप्ता, ED च्या चौकशीनंतर प्रकरणाला नवा ट्विस्ट

सुशांत भरत होता अंकिताच्या घराचा हप्ता, ED च्या चौकशीनंतर प्रकरणाला नवा ट्विस्ट

आतापर्यंत सुशांत सिंह राजपूतची (sushant singh rajput) गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर आरोप लावले जात होते, मात्र आता ईडीच्या चौकशीत एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेचंही (ankita lokhande) नाव समोर आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 14 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant singh rajput) सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर (Rhea Chakraborty) आरोप होत असताना आता या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं आहे. आता या प्रकरणात सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडेचंही (Ankita lokhande) नाव समोर येत आहे. सक्तवसुली संचालनालय (ED) रियाची चौकशी करत आहे. यामध्ये सुशांत अंकिता लोखंडेच्या घराचा हप्ता भरत असल्याचं समोर आलं आहे.

सुशांतने मालाडमध्ये 4.5 कोटी रुपये किमतीचा फ्लॅट खरेदी केला होता ज्याचा ईएमआय तो भरत होता. हा फ्लॅट तोच आहे, ज्यामध्ये त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता राहते, असं वृत्त इंडिया टुडेनं ईडी सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.

ईडीच्या चौकशीत रियाने या घराचा उल्लेख केला होता. रिया म्हणाली, "सुशांतच्या या फ्लॅटमध्ये अंकिता राहत होती आणि सुशांतला किती वाटलं तरी तो फ्लॅट तिला सोडायला सांगू शकत नव्हता. या फ्लॅटचा ईएमआय सुशांतच भरत होता"

हे वाचा - "महेश भट्ट म्हणाले, गप्प राहा नाहीतर तुलाही झोपवेन", जियाच्या आईचा खळबळजनक आरोप

सुशांत या घराचा किती हप्ता भरला आणि किती बाकी आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र सुशांतच्या बँक खात्याच्या माहितीनुसार दर महिन्याला हा हप्ता जात होता.

रियाने सुशांतचे 15 कोटी लुटल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबाने केला आहे. याप्रकरणी ED ने रिया चक्रवर्तीबरोबरच तिचा भाऊ शोविक, वडील इंद्रजित चक्रवर्ती यांच्याविरोधात पैशाच्या अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.

हे वाचा - अंकिता लोखंडेच्या बॉयफ्रेंडने सुशांतबाबत पहिल्यांदा शेअर केली अशी पोस्ट

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये (सीबीआयनेसुद्धा (CBI) आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामुळे रिया चक्रवर्तीच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. ही केस सीबीआयकडे सोपवण्यात यावी अशी मागणी सुरुवातीला रियानेच केली होती. आता सर्वोच्च न्यायालयात याचा तिनेच विरोध देखील केला. याप्रकरणातील सत्यता समोर आणली जावी, अशी मागणी वारंवार सुशांतच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे. अंकितानेदेखील ही मागणी केली आहे.

Published by: Priya Lad
First published: August 14, 2020, 10:13 PM IST

ताज्या बातम्या