मुंबई, 26 डिसेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020रोजी त्याच्या वांद्राच्या राहत्या घरी मृत्यू झाला. त्यानं गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं असं तपासांती पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र आता दोन वर्षांनी या प्रकरणात नवा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सुशांतचा मृत्यू हा सर्वांसाठी धक्कादायक होता. त्यानं आत्महत्या केली हे कोणालाच मान्य नव्हतं. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह अंधेरीच्या कूपर रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी नेण्यात आला होता. पोस्टमार्टमच्या वेळी उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्यानं सुशांतच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा केला आहे.
एशियानेट न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, 'सुशांतच्या पोस्टमार्टमवेळी रुपकुमार शाह हा कर्मचारी तिथे होता. त्यानं दावा केलाय की, जेव्हा सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला तेव्हा त्याचं पोस्टमार्टम करण्यासाठी त्याला कूपर रुग्णालयात आणण्यात आलं. त्या वेळेस कूपरमध्ये 5 बॉडी पोस्टमार्टमसाठी आणण्यात आल्या होत्या. त्यातील एक VIP डेड बॉडी होती. आम्ही पोस्टमार्टमसाठी गेलो तेव्हा आम्हाला कळलं की बॉडी सुशांत सिंह राजपूतची होती. त्यांच्या शरिरावर अनेक खुणा होत्या. मानेवरही 2-3 ठिकाणी जखमांच्या खुणा होत्या. पोस्टमार्टमचं रेकॉर्डिंग करायला हवी होती. पण उच्च अधिकाऱ्यांकडून आम्हाला केवळ बॉडीचे फोटो काढायला सांगितले. आम्ही तेव्हा ते काही केलं ते त्यांच्या आदेशानुसार केलं'.
हेही वाचा - शीझानने लग्नाचं वचन देऊन तिच्यासोबत...; तुनिषाच्या आईचे अभिनेत्यावर गंभीर आरोप
रुपकुमार यांनी पुढे सांगितलं, 'आम्ही जेव्हा सुशांतची डेड बॉडी पाहिली तेव्हा आमच्या सिनीअर्सना लगेच सांगितलं की ही आत्महत्या नसून ही हत्या आहे. आपल्याला नियमांनुसार करावं लागेल असंही मी सांगितलं. पण माझ्या सिनीअर्सनी मला बॉडीचे फोटो काढून लवकरात लवकर बॉडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात सांगितलं. त्यामुळेच आम्ही सुशांतचं पोस्टमार्टम रात्री केलं होतं'.
View this post on Instagram
कूपर रुग्णलयातील कर्मचाऱ्यानं केलेल्या खुलास्यानंतर सगळेच हैराण झाले आहेत. मात्र रुपकुमार शाहच्या बोलण्यात किती तथ्य आहे यावर प्रश्नचिन्ह आहे. परंतू ही माहिती खरी असेल तर सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाला पुन्हा नवं वळणं येण्याची शक्यता आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा देशातील तमाम तरुणींचा लाडका अभिनेता होता. 14 जून 2020ला सुशांतनं राहत्या घरी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. सुशांतच्या मृत्यूचा तपास सुरूवातीला मुंबई पोलीस करत होते. यात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचं नावं देखील पुढे आलं होतं. रियानं सुशांतला ड्रग्ज देऊन त्याची हत्या केली असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर सुशांत सिंह मृत्यू प्रकरण मुंबई पोलिसांकडूनED, NCB आणि CBI पर्यंत पोहोचलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News